आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्या' मृतदेहाची ओळख पटली:मनसुखची डेड बॉडी सापडल्याच्याच ठिकाणी आणखी एक मृतदेह, मुंब्रातील 48 वर्षीय अब्दुल यांचे असल्याचे स्पष्ट

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनसुख हिरेन प्रकरणाशी संबंध काय? मृतदेह कुणाचा? याचा तपास सुरू

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास सुरू असतानाच शनिवारी आणखी एक मृतदेह सापडल्याने गुंतागुंत वाढली आहे. विशेष म्हणजे, मुंब्रातील ज्या ठिकाणी मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला होता, त्याच ठिकाणी हा मृतदेह सापडला आहे. स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनच्या मृत्यूचा तपास दहशतवाद विरोधी पथक (ATS) करत आहे.

मृतदेह कुणाचा?

एटीएसचे पथक या ठिकाणी अनेकदा तपासासाठी गेली होती. त्यात शनिवारी हा मृतदेह सापडला. मुंबई पोलिसचे अधिकारी आणि एटीएस घटनास्थळी पोहोचले. एएनआयच्या वृत्तानुसार, हा मृतदेह 48 वर्षीय शेख सलीम अब्दुल यांचा आहे. ते मुंब्रातील रेतीबंदर परिसरातील रहिवासी होते. पण त्यांची हत्या झाली की आत्महत्या? सोबतच या मृतदेहाचा संबंध मनसुख किंवा अँटिलिया प्रकरणाशी आहे का? याचा देखील तपास केला जात आहे.

8 दिवसांपूर्वी याच ठिकाणी क्राइम सीन केला रीक्रिएट

सध्या या मृतदेहाचे शवविच्छेदन केले जात आहे. त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. अँटिलिया स्फोटक प्रकरणातील स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनचा मृतदेह मुंब्रातील खाडीत 5 मार्च रोजी सापडला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक रुमाल होता. महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने 8 दिवसांपूर्वी याच ठिकाणी क्राइम सीन रीक्रिएट केला होता. तर 3 दिवसांपूर्वी या ठिकाणी तपासाकरिता आले होते.

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास सध्या महाराष्ट्र एटीएस करत आहे. या तपासामध्ये एटीएसची सचिन वाझे यांच्यावर संशय व्यक्त केला असून कोर्टात त्यांच्या ताब्याची मागणी केली. पण, वाझे सध्या अँटिलिया स्फोटक प्रकरणात NIA च्या तावडीत आहेत. सोबतच, न्यायालयाने एटीएसच्या याचिकेवर 30 मार्च रोजी सुनावणी घेणार असल्याचे म्हटले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, अँटिलिया स्फोटकांचा तपास करणारी राष्ट्रीय तपास संस्था मनसुख प्रकरण सुद्धा आपल्या हातात घेणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...