आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँटिलिया प्रकरण:सेशन कोर्टाचा ATS ला आदेश - मनसुखच्या मृत्यूचा तपास NIA ला सोपवावा; सचिन वाझेंना भेटण्यासाठी आलेल्या महिलेचा NIA घेत आहे शोध

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्कॉर्पियोमध्ये वाझेंनीच ठेवले होते धमकी असणारे पत्र

अँटिलिया प्रकरणासंबंधीत मनसुख हिरेनच्या मृत्यूच्या प्रकरणात ठाणे सेशन कोर्टाने बुधवारी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला (ATS) आदेश दिला की, या प्रकरणाचा तपास थांबवून हा राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA)ला सोपवावा. या प्रकरणात एनआयएने कोर्टाला अपील केले की केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतरही एटीएसने त्याकडे तपास हस्तांतरित केला नाही.

दुसरीकडे अँटिलिया तपासमध्ये NIA ला सलग नवीन पुरावे सापडत आहेत. दोन दिवसांपूर्वीच एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये छापेमारी करण्यात आली. या दरम्यान CCTV च्या तपासात समोर आले की, निलंबित API सचिन वाझे ज्या काळात या हॉटेलमध्ये थांबलेले होते, त्या दरम्यान एक महिला त्यांना भेटण्यासाठी आली होती. या महिलेजवळ नोटा मोजण्याचे मशीन होते.

NIA ला संशय आहे की, ही महिला वाझेंच्या जवळची व्यक्ती आहे, यामुळे महिलेचा तपास सुरू केला आहे. NIA ला संशय आहे की, ही महिला या संपूर्ण कटामध्ये सहभागी असू शकते.

सचिन वाझे 16 फेब्रुवारीपासून 20 फेब्रुवारीपर्यंत खोटे नाव, बनावट आधारकार्ड आणि फोटो दाखवून मुंबईच्या हॉटेल ट्रायडेंटमध्ये थांबले होते. सोमवारी NIA वाझेंना घेऊन येथे आली होती आणि जवळपास तीन तास सीनचे रीक्रिएशन केले. या दरम्यान CCTV फुटेज तपासण्यात आले आणि स्टाफच्या लोकांचा जबाब घेण्यात आला. वाझेंना मुकेश अंबानींचे घर अँटिलियाच्या बाहेरुन जिलेटिनने भरलेल्या स्कॉर्पियोच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

वाझेंच्या जवळ 5 बॅग होत्या, एकामध्ये जिलेटिन असल्याचा संशय
CCTV फुटेजच्या तपासात समोर आले आहे की, वाझे हॉटेलमध्ये आले तेव्हा त्यांच्या जवळ पाच बॅग होत्या, यामधील एका बॅगमध्ये जिलेटिन असण्याचा संशय आहे. यासोबतच शंका आहे की, त्यांना भेटण्यासाठी आलेल्या महिलेला स्फोटके ठेवण्याच्या संपूर्ण कटाची माहिती होती. सूत्रांनुसार वाझेंनी महिलेविषयी NIA माहिती दिली आहे.

वाझेंचे बनावट आधारकार्ड
वाझेंचे बनावट आधारकार्ड

NIA ला वाझेंचे बनावट आधारकार्ड मिळाले
NIA च्या तपासात समोर आले आहे की, वाझेंनी आपले बनावट आधारकार्ड बनवले होते. या आधार कार्डमध्ये फोटो वाझेंचाच आहे, मात्र त्यांच्या नावाच्या ठिकाणी सुशांत सदाशिव खामकर लिहिले आहे. याच आधार कार्डच्या माध्यमातून सचिन वाझेंनी अनेक ठिकाणी हॉटेल बुक केल्याचा संशय आहे. वाझेंच्या फेक आधारकार्डवर 7825-2857-5822 नंबर आहे. याचा वापर करत ते 16-20 फेब्रुवारीच्या काळात नरीमन पॉइंट येथील हॉटेल ट्रायडेंटमध्ये थांबले होते.

स्कॉर्पियोमध्ये वाझेंनीच ठेवले होते धमकी असणारे पत्र
NIA च्या तपासात हे देखील समोर आले आहे की, सचिन वाझेंनीच स्कॉर्पियोमध्ये धमकी असलेले पत्र लिहिले होते. हे पत्र मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात अटक केलेल्या विनायक शिंदेंच्या घरी लिहिण्यात आले होते. शिंदेंच्या घरातून ते प्रिंटरही जप्त करण्यात आले आहे. या प्रिंटरमधून पत्र प्रिंट करण्यात आले होते. सूत्रांनी दावा केला आहे की, वाझे स्कॉर्पियो उभी करण्यापूर्वी इनोवामध्ये घटनास्थळी पाहणी करण्यासाठी गेले होते.

बातम्या आणखी आहेत...