आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँटिलिया केस:NIA टीमला सचिन वाझेंच्या सिक्रेट डायरीमध्ये आर्थिक व्यवहाराचे पुरावे मिळाले, धमकी देण्यात आलेल्या पत्राचे प्रिंटरही जप्त

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अँटिलिया स्फोट केसचा तपास करत असलेल्या NIA टीमला सचिन वाझेंकडून एक सिक्रेट डायरी मिळाली आहे. ही डायरी वाझे यांनी CIU ऑफिसमध्ये लपवून ठेवली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तंत्रज्ञान क्षेत्रात माहीर असलेले वाझे आपल्या सिक्रेट गोष्टींचा ऑनलाईन रेकॉर्ड ठेवत नव्हते, तर डायरीत नोंद करून ठेवायचे. या डायरीमध्ये आर्थिक व्यवहाराचे पुरावे मिळाले आहेत. यातील जास्त व्यवहार हे कॅश ट्रान्स्फरचे आहेत.

धमकीचे पत्र ज्या प्रिंटरमधून प्रिंट झाले ते प्रिंटरही जप्त
या प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करत NIA टीमने कळवा येथील अटक केलेले कॉन्स्टेबल विनायक शिंदेच्या घरातील एक प्रिंटर जप्त केले आहे. याच प्रिंटरमधून स्कॉर्पिओ गाडीतून मिळालेले धमकीचे पत्र प्रिंट केल्याचा NIA टीमला संशय आहे. पत्रामध्ये लिहिले होते की 'प्रिय नीता भाभी और मुकेश भैया और परिवार, यह सिर्फ एक ट्रेलर है। अगली बार, आपके परिवार के पास उड़ान भरने के लिए पर्याप्त सामान होगा। सावधान रहें।'

बातम्या आणखी आहेत...