आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटी वसूलीचे आरोप:देशमुखांविरोधात वकिलाने दिले ईडीला पुरावे; अनिल देशमुख यांची आज ईडीसमोर हजेरी

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईडीने कुंदन शिंदे आणि खासगी सचिव संजीव पलांडे यांना अटक केली आहे

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पैशांच्या गैरव्यवहारासंबंधी काही दस्तऐवज नागपूरस्थित वकील तरुण परमार यांनी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) सादर केले. दरम्यान, देशमुखांना मंगळवारी ईडी कार्यालयात पाचारण करण्यात अाले आहे. देशमुख व इतर काही राजकीय नेते पैशांचे गैरव्यवहार, भ्रष्टाचार कसे करतात याचे पुरावे आपल्याकडे आहेत, अशी तक्रार परमार यांनी ईडीकडे केली होती.

गेल्या आठवड्यात ईडीने परमार यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. परमार बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयात मंगळवारी सकाळी हजर झाले. त्यांनी सोबत काही दस्तऐवज आणला होता तो ईडीच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. तत्पूर्वी, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी ईडीने शनिवारी अनिल देशमुख यांना चौकशीसाठी पाचारण केले होते.

परंतु त्यांच्या वतीने वकील जयंत पाटील हजर राहिले. त्यांनी या प्रकरणाशी संबंधित दस्तऐवज ईडीकडे मागवले होते. ईडीने देशमुख यांना मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. ईडीने त्यांचे स्वीय सहायक कुंदन शिंदे आणि खासगी सचिव संजीव पलांडे यांना अटक करण्यात अाली आहे.

बातम्या आणखी आहेत...