आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटिलिया प्रकरण:अनिल देशमुखांचे स्वीय सहायक शिंदे, पलांडे यांची सीबीआयकडून चौकशी

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 100 कोटींची वसुली, डीआरडीओ गेस्ट हाऊसवर 8 तास झडती

दरमहा १०० कोटींच्या वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या स्टाफमधील दोन कर्मचाऱ्यांची केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी सुमारे ७ ते ८ तास कसून चौकशी केली. स्वीय सहायक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांची सांताक्रुझ येथील डीआरडीओच्या गेस्ट हाऊसमध्ये सीबीआय पथकाकडून झाडाझडती घेण्यात आली. माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या सनसनाटी आरोपानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सीबीआयने प्राथमिक चौकशी (पीई) अहवाल नोंदवून तपास सुुुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिंदे आणि पलांडे यांना रविवारी सांताक्रुझ येथे डीआरडीओ गेस्टमध्ये पाचारण करण्यात आले होते. दिल्लीहून आलेले सीबीआय पथक या ठिकाणी या खटल्याशी संंबंधित सर्वांची चौकशी करीत आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझेला मुंबईतील बार अाणि रेस्टॉरंट चालकांकडून दरमहा १०० कोटी वसूल करण्यास सांगितले त्या वेळी पलांडे तिथे हजर होते असा दावा परमबीरसिंग यांच्या पत्रामध्ये करण्यात अाला होता. तर अँटिलियाप्रकरणी अटकेत असलेल्या वाझे याने एनआयएला लिहिलेल्या पत्रामध्ये १०० कोटींची वसुली करण्यास गृहमंत्र्यांनी सांगितले त्या वेळी शिंदे तिथे हजर होते असा दावा केला आहे.

बातम्या आणखी आहेत...