आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसूली प्रकरणात चौकशी:100 कोटी वसूली प्रकरणात ईडीने नोंदवला बार मालकाचा जबाब; मुंबईतील 5 बार मालकांना चौकशीसाठी समन्स

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीबीआयने देखील या बारमालकाचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले आहे.

अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटीच्या वसुली आरोप प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालयाने मुंबईतल्या एका बार मालकाचा जबाब नोंदविला आहे. त्याच बरोबर मुंबईतल्या पाच बार मालकांना देखील समन्स पाठविला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप केला होता.

या प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने (ED) गुन्हा नोंदवला असून मुंबईतील पाच बार मालकांना समन्स बजावला आहे. दरम्यान, अंधेरीतील एका बार मालकाने सचिन वाझेंना महिन्याला अडीच लाख रुपये देत असल्याची माहिती देखील सक्त वसुली संचालनालयाला दिली असल्याचे कळते आहे. त्याचबरोबर सीबीआयने देखील या बारमालकाचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले आहे.

बातम्या आणखी आहेत...