आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘परम’कथा:अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट नकार; आरोप गंभीर, हे सीबीआयच्या चौकशीचे प्रकरण होत नाही का?

नवी दिल्ली/मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वोच्च न्यायालय : देशमुख यांची तर पद सोडण्याची इच्छाच नव्हती

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय चौकशीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. ‘या प्रकरणात स्वतंत्र चौकशीची गरज आहे. कारण, ज्यांनी आरोप केले आणि ज्यांच्यावर केले ते दोघेही सरकारमध्ये उच्च पदांवर राहिले आहेत. त्यांनी काही काळ सोबत काम केलेले आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही,’ अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली. न्या. किशन कौल खंडपीठाने अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी केली. उर्वरित. पान १०

वाझे यांचे आरोप धादांत खोटे : अजित पवार
सचिन वाझे या व्यक्तीला मी कधीही भेटलो नाही तरीदेखील हा माणूस माझ्यावर जे आरोप करत आहे ते धादांत खोटे आहेत. त्याने केलेल्या आरोपाची चौकशी करून ‘दूध का दूध-पानी का पानी’ जनतेसमोर येऊ द्या, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

उच्च न्यायालयाने दिला होता सीबीआय चौकशीचा आदेश
मुंबई उच्च न्यायालयाने ५ एप्रिलला अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश दिला होता. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी तसेच मुंबईच्या वकील जयश्री पाटील यांनीही अशीच याचिका दाखल केली होती. त्याआधी परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, ‘वसुली करण्यासाठी देशमुख गृहमंत्री म्हणून पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव आणत होते. त्यांनी सचिन वाझे व इतरांना दर महिन्याला १०० कोटी वसुली करण्याचे उद्दिष्ट दिले होते,’ असा गंभीर आरोप केला होता.

सर्वोच्च न्यायालय : देशमुख यांची तर पद सोडण्याची इच्छाच नव्हती
अनिल देशमुख यांनी तर जाहीर आरोप झाल्यानंतर सुरुवातीला राजीनामाही दिला नव्हता. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. म्हणजे गृहमंत्र्यांना (तत्कालीन) आपले पद सोडण्याची इच्छाच नव्हती. स्वतंत्र चौकशी होऊ द्या. हे त्यासाठीचे उत्तम प्रकरण आहे.

अनिल देशमुख : मी आरोपी नाही, संशयितही नाही, आरोपांचा कुठलाही पुरावा नाही
मी आरोपी नाही आणि संशयितही नाही (आरोपी तपास संस्थेची निवड करू शकतो का? या न्यायालयाच्या प्रश्नावर). माझ्याविरोधात जे आरोप आहेत त्या ऐकीव गोष्टी आहेत. त्यासाठी कुठलाही पुरावा नाही. वाझेने दुसऱ्या व्यक्तीला हे सर्व सांगितले आहे. त्यानंतर भुजबळ यांना आणि भुजबळ यांनी पोलिस आयुक्तांना (परमबीर). त्यांनी हा खुलासा पदावरून हटवल्यानंतरच केला.’

कपिल सिब्बल (देशमुख यांचे वकील)
बाहेरील संस्थेला मध्ये आणू नका. ‘प्राथमिक चौकशी होऊ नये असे मी म्हणत नाही, पण आपण (न्यायालय) आधी माझे म्हणणे ऐकून घ्यावे. त्यानंतर ठरवावे. बाहेरील संस्थेला मध्ये आणू नका. त्यात अनेक समस्या आहेत. संधी न दिली गेल्यामुळे मला तिरस्कृत झाल्यासारखे वाटत आहे. आपण पाहा, त्यामुळे आतापर्यंत किती नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...