आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्योगपती मुकेश अंबानींचे घर अँटिलिया समोर स्फोटके सापडणे आणि नंतर या प्रकरणासंबंधीत मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू आहे. या प्रकरणाचा खुलासा लवकरच होणार असल्याचे मानले जात आहे. स्फोटके प्रकरणाचा तपास नॅशनल इन्वेस्टिगेशन एजेंसी (NIA) आणि मनसुख यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास अँटी टेररिज्म स्क्वाड (ATS) करत आहे.
NIA बुधवारी रात्री निलंबित केलेले पोलिस अधिकारी (API) सचिन वाझेंना ठाण्यात घेऊन गेले. तिथे अनेक ठिकाणी सीन रिक्रिएशन करण्यात आले. रात्री उशीरा NIA च्या दोन टीमने वझेंच्या घराची झाडाझडती घेतली. यामध्ये अनेक कागदपत्रे ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यांच्या सोसायटीच्या लोकांचीही चौकशी करण्यात आली.
लवकरच आणखी काही पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयएची टीम या प्रकरणात सह पोलिस आयुक्त (क्राइम) मिलिंद भारंबे आणि उप पोलिस आयुक्त (क्राइम) प्रकाश जाधव यांचे जबाबही नोंदवेल. NIA हे जाणून घ्यायचे आहे की कुणाच्या सांगण्यावरुन वाझेंना स्कॉर्पिओ प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली होती. NIA भारंबे आणि जाधव यांचा जबाब अत्यंत महत्त्वाचे मानते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिस आयुक्तपदावरून काढून टाकण्यात आलेल्या परमबीर सिंग यांच्या सूचनेनुसार वाझे यांना या प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली होती. अशा परिस्थितीत, या प्रकरणाचा तपास परमबीर सिंह यांच्यापर्यंतही पोहोचू शकतो. ज्यूरिडिक्शन नसतानाही हे प्रकरण सचिन वाझे यांच्याकडे का सोपवले गेले, त्याचे उत्तर त्यांना द्यावे लागेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.