आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसुख हिरेन हत्या प्रकरण:अँटिलिया स्फोटके प्रकरणी माफीचा साक्षीदार होण्याचा सुनील माने यांचा अर्ज मागे

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी पोलिस अधिकारी सुनील माने यांनी अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी माफीचा साक्षीदार होण्यासाठी केलेला अर्ज मंगळवारी मागे घेतला आहे.

सुनील माने म्हणाले की, 26 वर्षांच्या कारकिर्दीत चांगलीच कामगिरी केली. केंद्र तसेच राज्य सरकारचे 280 पुरस्कारही मिळाले. कारागृहात राहिल्यावर केलेल्या चुकांचा पश्चात्ताप झाला, म्हणूनच माफीचा साक्षीदार होण्याचा निर्णय घेतल्याचे माने यांनी अर्जात म्हटले होते. या प्रकरणातील घटनाक्रम आणि तथ्ये सांगण्याचा निर्णय घेतल्याचा दावा माने यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवणाऱ्या अर्जात केला होता. न्यायालयानेही या अर्जाची दखल घेऊन त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिले होते.

एनआयएनेचा विरोध

त्यानुसार, एनआयएने उत्तर दाखल करून या प्रकरणात माने यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे त्यांच्या माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याच्या अर्जाला आपला विरोध असून तो फेटाळण्यात यावा, अशी मागणी विशेष न्यायालयाकडे केली होती.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण नेमके काय?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतल्या अँटालिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. ही स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या नावावर होती. या घटनेच्या काही दिवसांनीच म्हणजे 5 मार्चला मुंब्रा इथल्या रेतीबंदर भागात मनसुख हिरेनचा मृतदेह सापडला होता. ही हत्या असल्याचा दावा करत NIA ने सचिन वाझे यांना अटक केली. सध्या ते कोठडीत आहेत.

तसंच आणखी 8 आरोपींविरोधआत आरोपपत्र दाखल करण्यात आलं. हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मनसुख हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमकं काय घडलं याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकलं. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केली. पोस्टमार्टमच्या रिपोर्टमध्ये हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता.