आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण:अर्णब गोस्वामींसह आणखी दोघांना समन्स, 1800 पानांचे दोषारोपत्र कोर्टात दाखल

रायगडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिन्ही आरोपींना 7 जानेवारीला न्यायालयात हजर राहावे लागणार

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी १८०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. याबाबत बुधवारी मुख्य न्यायदंडाधिकारी सुनयना पिंगळे यांच्या न्यायालयात सुनावणी पार पडली. आरोपींविरोधात दाखल केलेल्या दोषारोपपत्राची दखल न्यायालयाने घेतली असून अर्णब गोस्वामी, नीतेश सारडा आणि फिरोज शेख या तिघांना न्यायालयाने समन्स जारी केले आहेत. त्यामुळे ७ जानेवारीला तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी, नीतेश सारडा आणि फिरोज शेख यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रायगड पोलिसांनी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांनी दाखल केलेले दोषारोपपत्राची न्यायालयाने दखल घेतली आहे. त्यामुळे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची सुनावणी ७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. यासाठी तिन्ही आरोपींना न्यायालयाने समन्स जारी केले आहे. त्यामुळे आता सर्वांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser