आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्किटेक्टच्या पत्नीचा आरोप:अन्वय नाईकांच्या पत्नीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, अर्णब माझ्या कुटुंबियांचा गुन्हेगार असल्याचे म्हणत मागच्या सरकारने केस दाबून टाकल्याचा केला आरोप

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अन्वय नाईक यांची मुंबईत 'कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड' या नावाची कंपनी होती.

आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर महाविकास आघाडी सरकारवर प्रचंड टीका केली जात आहे. दरम्यान आता अन्वय नाईक यांच्या पत्नीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी अर्णब गोस्वामीला आपला पती आणि सासूच्या आत्महत्येला जबाबदार धरले आहे. तसेच मागच्या सरकारने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचाही त्या म्हणाल्या आहेत.

अन्वय नाईकांच्या पत्नी म्हणाल्या...
अन्वय नाईक यांच्या पत्नीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ अर्णब गोस्वामीला अटक होण्यापुर्वीचा असल्याचे दिसतेय. यामध्ये त्या म्हणत आहेत की, 'सुशांत सिंह राजपुतने आत्महत्या केली हे वाईट आहे. अर्णब गोस्वामी यासाठी खूप ओरडतोय. माझ्या सासुबाईच्या आणि नवऱ्याच्या आत्महत्येला अर्णब गोस्वामी जबाबदार आहे. मागच्या सरकारने ही केस दाबून टाकली. या केससंबंधी मी दारोदारी फिरले. अजुनही मला न्याय मिळालेला नाही. मला न्याय कधी मिळणार. अर्णब गोस्वामी हा माझ्या कुटुंबियांचा गुन्हेगार आहे आणि त्याला अटक ही झालीच पाहिजे. सर्व महाराष्ट्रातील बांधवांना मी विनंती करते की, त्यांनी नाईक कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी. जे लोक सुशांत सिंह राजपूतसाठी ओरडत आहे त्यांनी नाईक कुटुंबियांसाठीही ओरडावे अशी मी विनंती करते.' असे अन्वय नाईकांच्या विधवा पत्नी यामध्ये म्हणत आहेत.

अन्वय नाईकांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे अर्णब गोस्वामींचे नाव
अन्वय नाईक यांची मुंबईत 'कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड' या नावाची कंपनी होती. मे 2018 अन्वय नाईक यांनी अलिबाग जवळील आपल्या घरामध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या खिश्यामध्ये एक सुसाईट नोट आढळून आली होती. या नोटमध्ये अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा यांनी आपले पैसे थकवले आहे. यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे तिघांविरोधात आत्महत्येत प्रवृत्त केल्या प्रकरणी अलिबाग पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे देण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापन करण्यात आली होते. यापूर्वी अर्णब गोस्वामी याची याप्रकरणी चौकशी झाली होती. कारवाई झाली नव्हती. आज या प्रकरणात अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आली आहे.