आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पंतप्रधानांवर निशाणा:दाढी मिशा कुणीही वाढवू शकतो, हिंमत असेल तर रोजगार वाढवा ! काँग्रेसचा नरेंद्र मोदींना खोचक टोला

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन पुकारण्यात आलं होतं. मात्र या लॉकडाऊनचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झालेला आहे. उद्योगधंदे बंद झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, बेरोजगारी वाढली आहे. याच मुद्द्यावरून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

कोरोना संक्रमणाची साखळी मोडता यावी यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे अख्खा देश हा दोन ते अडीच महिने घरात बसून होता. या काळात अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले होते. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर आणि सेवा व उद्योग क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. याचा सर्वांचा परिणआम जीडीपीवर झाला आहे, तसेच देशाच्या विकासदरात मोठी घट झाली आहे. दरम्यान या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वेगळा लूक पाहायला मिळतोय. पंतप्रधानांनी दाढी व मिशा वाढवल्या आहेत. आता याच कारणावरुन काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाण साधला आहे. 

काँग्रेसचे नेते राजीव सातव ट्विट करत म्हणाले की, 'हिंमत असेल तर जीडीपी, रोजगार वाढवा. दाढी मिशा तर कोणीही वाढवू शकतो,' असा टोला मोदींना लगावला आहे. सातव यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नव्या लूकचा संदर्भ देत त्यांच्यावर नाव न घेता टीका केली. पंतप्रधानांनी सध्या दाढी मिशा वाढवलेल्या आहेत. त्याच अनुषंगानं सातव यांनी एक खोचक ट्वीट केलं आहे.