आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Appeal To Marathi People To Vote In Unison, Once Again The Flag Of Chhatrapati Shivaji Maharaj Will Fly Over Belgaum Municipal Corporation Sanjay Raut

बेळगाव महापालिका निवडणूक:मराठी माणसांना एकजुटीने मतदान करण्याचे आवाहन, पुन्हा एकदा बेळगावर पालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फडकणार; संजय राऊतांना विश्वास

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एकजूट होऊन मतदान करण्याचे आवाहन

बेळगाव महापालिकेसाठी आज मतदान होत आहे. या विषयावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. बेळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडाच फडकेल. असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. तसेच आम्ही 30 च्या आसपास जागा जिंकणारच असेही राऊत म्हणाले आहेत. बेळगावात मराठी माणसाचीच सत्ता येईल असेही राऊत म्हणाले.

बेळगाव महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्यासाठी मराठी भाषकांनी कंबर कसली आहे. भाजप, काँग्रेस, जनता दल, एमआयएम हे पक्ष पहिल्यांदाच येथे निवडणुकीत उतरले आहेत. दरम्यान पालिकेवर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फडकणार असा विश्वास राऊतांना आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, 'आठ वर्षांनी बेळगाव पालिकेची निवडणूक होत आहे. बहुमताने मराठी सत्ता असणारी पालिका द्वेषबुद्दीने बर्खास्त करण्यात आली, येथील भगवा झेंडा काढण्यात आला. लोकशाहीची हत्या करणारी अशी अनेक कृत्य कर्नाटक सरकारकडून करण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीमध्येउमेदवार शुभम शेळके यांना लाखोंची मतं पडली. एकजूट चांगली होतेय' असेही राऊत म्हणाले.

एकजूट होऊन मतदान करण्याचे आवाहन
राऊत पुढे म्हणाले की, 'महाराष्ट्र एकीकरण समिती आणि इतर मराठी संघटना मिळून 30 च्या आसपास जागा जिंकू आणि पुन्हा एकदा बेळगाव महापालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फडकेल. उत्साही वातावरण येथे दिसेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. यासोबतच त्यांनी एकजुटीने मतदान करा असे आवाहन बेळगावातील मराठी नागरिकांना केले आहे.

बातम्या आणखी आहेत...