आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण:निवड यादीतील 1 हजार 64 उमेदवारांना नियुक्ती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवड यादीत असलेल्या १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली.

मराठा आरक्षण व अन्य मागण्यांच्या बाबतीत सह्याद्री अतिथिगृह येथे गुरुवारी रात्री बैठक झाली. या बैठकीला शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,अर्जुन खोतकर, संभाजीराजे छत्रपती, नरेंद्र पाटील, मराठा मोर्चाचे आबासाहेब पाटील, मराठा आरक्षण कार्यकर्ते विनोद पाटील यांच्यासह विविध संघटना आणि मराठा समन्वयक उपस्थित होते.

702 उमेदवारांसाठी मोहीम :

साधारणपणे २ हजार १८५ उमेदवार मराठा आरक्षण घेऊन शासन सेवेत रुजू होणार आहेत. यापैकी ४१९ उमेदवार शासन सेवेत रुजू झाले आहेत तर १ हजार ०६४ उमेदवारांना विविध विभागांमध्ये तत्काळ रुजू करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल. उर्वरित ७०२ उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत विशेष मोहीम घेण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...