आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Are You The 'head Master' Or The 'remote Control' Of This Government? Sharad Pawar Gave A Definite Answer To This Much Discussed Question

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संजय राऊतांनी घेतली पवारांची मुलाखत:तुम्ही या सरकारचे 'हेड मास्टर' आहात की 'रिमोट कंट्रोल'? या बहुचर्चित प्रश्नाचं शरद पवारांनी दिलं हे रोखठोक उत्तर

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत शरद पवारांनी अनेक प्रश्नांची रोखठोक उत्तर दिली आहेत. यावेळी नी महाराष्ट्रातील राजकारणातील अनेक मुद्दयांना हात घातला आहे. यासोबतच महाविकास आघाडीवित्यांषयी होणाऱ्या अनेक चर्चांविषयी स्पष्टकरणही दिले आहेत. यावेळी तुम्ही आघाडी सरकारचे हेड मास्टर आहात की रिमोट कंट्रोल असा प्रश्न राऊतांनी पवारांना विचारला. यावर त्यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे. आपण या दोघांपैकी काहीही नसल्याचं पवारांनी स्पष्ट केलं. यासोबतच लोकशाहीमध्ये अशा गोष्टी नसतात, असंही ते म्हणाले आहेत. 

महाविकास आघाडीविषयी अनेक चर्चा नेहमीच केल्या जातात. तसेच शरद पवार हे महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल आणि हेडमास्टर असल्याचेही विरोधकांकडून नेहमीच म्हटले जाते. यावर पवारांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, 'मी महाविकास आघाडी सरकारचा हेड मास्टरही नाही आणि रिमोट कंट्रोल देखील नाही. हेडमास्टर असला तर तो शाळेत असायला हवा. लोकशाहीमध्ये सरकार किंवा प्रशासन हे रिमोटने कधीही चालत नसते. जिथे लोकशाही नाही तिथंच रिमोट चालतं. मात्र आपण लोकशाहीमध्ये राहतो. यामुळे इथे रिमोट नसतो. आपण रशियाचं उदाहरण पाहिलं तर तेथे पुतीन 2036 पर्यंत रशियाचे अध्यक्ष राहणार आहेत. ही एकप्रकारे एकहाती सत्ताच आहे. लोकशाही वगैरे सर्वकाही बाजूलाच केले आहे. त्यामुळे आपण म्हणू तसे सरकार चालवले पाहिजे हा अट्टाहास येथे आहे. मात्र आपल्याकडे लोकशाही आहे आणि लोकशाहीचे सरकार कधीही रिमोट कंट्रोलवर चालू शकत नाही. मला ते मान्य नाही. सरकार मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळच चालवत असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं. 

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser