आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिवसैनिक मुंबईतील बीकेसी मैदानावर दाखल झाले आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंकडून शिवतीर्थाचे आमंत्रण आल्यास जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर एकनाथ शिंदे साहेबांनी ठरवावे. त्यांच्याशी बोलावे, अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर यांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटानं मुंबईतील बीकेसी मैदानात दसरा मेळाव्याचे आयोजन केले आहे. अर्जुन खोतकर अखेरच्या टप्प्यात शिंदे गटात दाखल झाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते शिंदे गटात चांगलेच सक्रिय झाले आहेत. अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिंदे गटाचे शिवसैनिक समृद्धी महामार्गाने मुंबईत पोहोचले आहेत. मात्र, उदघाटनापूर्वीच कार्यकर्त्यांसाठी महामार्ग कसा काय खुला करण्यात आला? असा सवाल विरोधकांनी केला आहे. यावर अर्जुन खोतकर यांनी माध्यमांशी बोलताना आम्ही वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तसे केले, असे म्हटले.
विरोधकांची टीका
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर टीका केली आहे. समृद्धी महामार्ग अजूनही जनतेसाठी खुला झालेला नाही, अजूनही त्याची काम अपूर्ण आहेत. एखादा नागरिक गेले तर त्यांना हटकले जाते. त्यामुळे यास जबाबदार असणारे अधिकारी आणि संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, असे अंबादास दानवे म्हणाले. तर सामान्य नागरिकाने समृद्धी महामार्गाचा वापर केल्यास त्याला दंड आकारण्यात येतो. आता प्रशासन यांच्यावर काय कारवाई करणार आहे? आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे
जोरदार शक्तिप्रदर्शन
दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिंदे गटाकडून बीकेसी भागात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे. तर उद्धव ठाकरेंच्या गटाची शिवाजी पार्कमध्ये सभा होणार आहे. दोन्ही गट पक्षाच्या दसरा मेळाव्याद्वारे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.