आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ड्रग्स केसमध्ये अडकलेला अभिनेता अर्जुन रामपालची नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) कडून चौकशी केली जात आहे. रामपाल जवळपास 11.10 वाजता NCB ऑफिसमध्ये पोहोचला. यापुर्वी NCB ने रामपालचा मित्र पॉल बर्टेलला अटक केली. तपास एजेंसीने गुरुवारी रात्री पॉलला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. जवळपास 10 तास प्रश्नोत्तरानंतर त्याला अटक करण्यात आली. पॉल ऑस्ट्रेलियाई मुळचा आर्किटेक्ट आहे. तो रामपालच्या अनेक पार्टीजमध्ये उपस्थित होता. रामपाल आणि पॉलला समोरासमोर बसवून चौकशी केली जाऊ शकते.
सोमवारी एनसीबीने रामपालच्या घरावर छापा टाकला. यानंतर, बुधवार आणि गुरुवारी, त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डीमेट्रिएडची चौकशी करण्यात आली होती. आतापर्यंत ग्रबीएलाची 12 तास चौकशी करण्यात आली आहे. सोमवारी तपास यंत्रणेने रामपालच्या ड्रायव्हरला ताब्यात घेऊन अनेक तास चौकशी केली. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामपालच्या घरातून काही बंदी घातलेली औषधे आढळली. रामपालला उत्तर द्यावे लागेल की ही औषधे कोठून आली आणि त्यासाठी कायदेशीर प्रिस्क्रिप्शन त्याच्याकडे आहे का?
याशिवाय त्याच्या घरातून काही मोबाइल फोन आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले होते. NCB ला इलेक्ट्रॉनिक एविडेंस रिपोर्टही आले आहेत, हे दाखवून रामपालला प्रश्न विचारले जातील.
गेल्या महिन्यात गॅब्रिएलाच्या भावाला अटक करण्यात आली होती
एनसीबीने 19 ऑक्टोबरला गॅब्रिएलाचा भाऊ अअगिसिलाओसला लोणावळ्यातून अटक केली होती. त्याच्याकडे चरस आणि अल्प्राजोलम टॅबलेट मिळाल्या होत्या. त्याच्याकडून सापडलेल्या पुराव्याच्या आधारे रामपालच्या घरावर छापा टाकण्यात आला.
फिरोज नाडियाडवालाचीही झाली होती चौकशी ड्रग्स प्रकरणात NCB ने रविवारी को प्रोड्यूसर फिरोज नाडियाडवालाच्या घरावरही छापा मारला होता. त्याची चौकशी करण्यात आली होती. त्याची पत्नी शबाना सईदला अटक करण्यात आली होती. दरम्यान शबानाला सोमवारीच जामीन मिळाला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.