आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलीवूड ड्रग्स प्रकरण:अरमान कोहली आज न्यायालयात होणार हजर, एनसीबीचा दावा - अनेक गंभीर प्रकरणांमध्ये आरोपी आहे अरमान; कोठडीत वाढ करण्याची होऊ शकते मागणी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमचा उद्देश केवळ बॉलिवूडला लक्ष्य करणे नाही

बॉलीवूड ड्रग्स प्रकरणात दिवसेंदिवस नवीन खुलासे समोर येत आहे. एनसीबीने या प्रकरणात आतापर्यंत अनेक अभिनेत्यांना अटक केली आहे. दरम्यान, अभिनेता अरमान कोहलीला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे अरमानच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अरमानची आज एकदिवसीय कोठडी संपत आहे. त्यामुळे सुनावणीदरम्यान एनसीबी आज अरमानच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करु शकते. अभिनेता अरमान कोहली बॉलीवूड ड्रग्स प्रकरणावितिरिक्त अनेक गंभीर प्रकरणांमध्ये आरोपी असल्याचा दावा मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी केला आहे.

आमचा उद्देश केवळ बॉलिवूडला लक्ष्य करणे नाही
समीर वानखडे म्हणाले की, एनसीबीने बॉलीवूड प्रकरणात प्रवेश केल्यापासून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु, आमचे उद्देश केवळ बालीवूड अभिनेत्याला लक्ष्य करणे नाही. "आम्ही ड्रग्जविरोधात झिरो टॉलरेंस मोहीम सुरू केली असून शहर नशामुक्त करण्यासाठी अनेक ठिकाणी छापेमारी सुरु आहे. 'झिरो टॉलरन्सचा अर्थ असा नाही की, आम्ही फक्त फिल्म इंडस्ट्रीवर छापा टाकू. आम्हाला फक्त NDPS (नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक पदार्थ) कायद्याच्या उल्लंघनाची चिंता आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचे समीर वानखडे यांनी म्हटले आहे.

अरमान कोहलीला रविवारी झाली अटक
एनसीबीने अभिनेता अरमान कोहलीला रविवारी अटक केली. अनेक तासांच्या छाप्यांनंतर एनसीबीने अरमानच्या घरातून कोकेन जप्त केले. कोहलीविरोधात एनडीपीएसच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीव्ही अभिनेता गौरव दीक्षितला शुक्रवारी एनसीबीने अटक केल्यानंतर कोहलीविरुद्धची ही कारवाई करण्यात आली.

कोहली यापूर्वीही सापडला आहे वादात
बिग बॉस शोमध्ये सहभागी झालेल्या अरमान कोहलीला उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्याच्या घरातून महागड्या स्कॉच व्हिस्कीच्या 41 बाटल्या जप्त करण्यात आल्या. नियमानुसार, कोणतीही व्यक्ती दारूच्या 12 पेक्षा जास्त बाटल्या घरी ठेवू शकत नाही.

मैत्रिणीला मारहाण केल्याचा आरोपही होता
याआधी जून 2018 मध्ये कोहलीवर त्याच्या लिव्ह-इन गर्लफ्रेंड नीरू रंधावाला अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध मुंबईतील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये एका महिला फॅशन डिझायनरसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...