आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्णब यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला:आत्महत्या प्रकरणात पीडितांचेही काही अधिकार असतात : मुंबई उच्च न्यायालय

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जामिनासाठी अर्णब यांना कनिष्ठ न्यायालयात जाण्यास सांगितले

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व एम. एस. कर्णिक यांच्या पीठाने सांगितले की, जामिनासाठी अन्य पर्याय उपलब्ध आहेत. याचिकाकर्ता जिल्हा सत्र न्यायालयात जाऊ शकतात, तेथे ४ दिवसांत अर्जावर निकाल देण्यात येईल.

२०१९ मध्ये या प्रकरणात कोर्टाकडून खटला बंद केल्यानंतरही दंडाधिकाऱ्यांच्या मंजुरीशिवाय पोलिसांची कारवाई चुकीची आहे, असा युक्तिवाद गोस्वामींचे वकील हरीश साळवे यांनी केला होता. तो कोर्टाने फेटाळला. दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणात समरी रिपोर्ट मंजूर करताना पीडिताच्या अधिकाराकडे दुर्लक्ष केल्याचे न्यायालयाने म्हटले.

राज्यपालांना अर्णब यांच्या सुरक्षा व आरोग्याची चिंता

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुखांना फोन करून गोस्वामी यांची सुरक्षा व आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली. तसेच कुटुंबीयांना भेटू देण्याची मुभा द्यावी अशी सूचनाही केली. त्यावर राष्ट्रवादीने ‘नाईक कुटुंबीयांनाही सहानुभूती दाखवली असती तर बरे झाले असते,’ अशी टीका केली.

क्लोजर रिपोर्ट : पोलिस अधिकाऱ्याची चौकशी

नाईक आत्महत्येप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल करणारे तत्कालीन पोलिस अधिकारी सुरेश वराडेंच्या प्राथमिक चौकशीचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले. वराडेंवर तपासात हलगर्जीपणा केल्याचा ठपका आहे. तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारसकर व उपअधीक्षक निघोट यांचीही चौकशी शक्य आहे.

बातम्या आणखी आहेत...