आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्णबच्या चॅटवरुन खुलासे:बालाकोट स्ट्राइक आणि 370 हटवण्यासारखे निर्णय पहिलेच माहिती होते; काँग्रेसचा सवाल - पाकिस्तानपासून माहिती लपवल्याची गॅरंटी आहे?

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रशांत भूषण यांचा दावा - 'निवडणुकीसाठी नॅशनल सिक्युरिटीचा विचार करण्यात आला नाही'

बालाकोट एअर स्ट्राइकविषयी रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांना पहिल्यापासूनच माहिती होते. हा दावा ऑल्ट न्यूजचे को-फाउंडर प्रतीक सिन्हा यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत भूषण यांनीही आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, ज्या पुलवामा हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले, अर्णबने त्याचा आनंद साजरा केला होता. अर्णबला बालाकोट स्ट्राइकची माहितीही 3 दिवसांपूर्वीच मिळाली होती. अर्णबला काश्मीरमध्ये आर्टिकल 370 हटवण्याविषयीही आधीच माहिती होती.

सोशल मीडिया पोस्ट्समध्ये दावा केला जात आहे की, अर्णब आणि दासगुप्ता यांच्यात ही बातचित 2019 मध्ये झाली होती. मुंबई पोलिसच्या क्राइम ब्रांचजवळ उपलब्ध 500 पेजच्या व्हॉट्सअप चॅटचा हा भाग असल्याचे सांगितले जात आहे. टीआरपी घोटाळ्याचा तपास करत असलेल्या मुंबई क्राइम ब्रांचने नुकतेच 3,600 पानांची सप्लीमेंट्री चार्टशीट मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. यामध्ये पेज नंबर 1994 ते 2504 पर्यंत अर्णब आणि दासगुप्ता यांच्या झालेल्या व्हॉट्सअप चॅट आहेत.

काँग्रेसचे सवाल
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेता मनीष तिवारी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, 'जर मीडियाच्या एका भागाची रिपोर्टिंग योग्य आहे तर प्रश्न असा आहे की, बालाकोट स्ट्राइक आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये काही संबंध आहे? निवडणुकीत फायद्यासाठी राष्ट्रीय सुरक्षेला मुद्दा बनवण्यात आले? याचा संयुक्त संसदीय समिती (JPC)कडून तपास व्हायला हवा.'

पोलिसांनी म्हटले - व्हायरल चॅट चार्जशीटचा भाग
मीडियामध्ये ही चॅट लीक झाल्यानंतर सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन वजे यांनी म्हटले की, ही चॅट हायकोर्टमध्ये दाखल केलेल्या सप्लीमेंट्री चार्जशीटचा भाग आहे. मात्र, ही मीडियापर्यंत कशी पोहोचली. याची माहिती त्यांना नाही. अर्णब आणि BARC च्या माजी CEO यांच्यातील जी चॅट प्रतीक सिन्हाने शेअर केली आहे, त्यामध्ये अर्णबने लिहिले आहे की, स्ट्राइक करुन निवडणूक जिंकली जाईल.

अर्णब आणि BARC चे माजी CEO यांच्यातील जी चॅट प्रतीक सिन्हा यांनी शेअर केली आहे, त्यामध्ये अर्णबने लिहिले की, स्ट्राइक करुन निवडणूक जिंकली जाईल.

प्रशांत भूषण यांचा दावा - 'निवडणुकीसाठी नॅशनल सिक्युरिटीचा विचार करण्यात आला नाही'

यापूर्वी शुक्रवारीही प्रशांत भूषण यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्यांनी एक व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉर्ट्स शेअर केले होते. यामध्ये एक नाव अर्णब गोस्वामींचे दिसत आहे. तर दुसरे नाव पार्थो दासगुप्ता असल्याचा दावा केला जात आहे. दासगुप्ता ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउंसिल म्हणजेच BARC चे 2013 ते 2019 या काळात CEO होते. फेक TRP केसमध्ये त्यांना अटक झाली आहे. BARC ती संस्था आहे, जी देशाच्या 45 हजार घरांमध्ये टीव्हीवर लावल्या बार-ओ-मीटरच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्यात कोणते चॅनल किती पाहिले गेले हे सांगते.

व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटमध्ये काय लिहिले आहे हे आम्ही सांगत आहोत...

स्क्रीनशॉट 1: स्ट्राइकच्या 3 दिवसांपूर्वीच काही तरी मोठे होणार असल्याचा अर्णबचा दावा
प्रतीक सिन्हा यांनी जे स्क्रीनशॉट शेअर केले आहे, त्यामध्ये अर्णब गोस्वामी म्हणत आहे की, काही तरी मोठे होणार आहे. हे स्क्रीनशॉर्ट्स 23 फेब्रुवारी 2019 चे आहेत. म्हणजेच बालाकोट स्ट्राइकच्या 3 दिवसांपूर्वीचे आहेत. या चर्चेमध्ये BARC ते CEO विचारतात, दाऊद का? अर्णब बोलतो - नाही, पाकिस्तान. काही तरी मोठे होणार आहे. BARC चे CEO विचारतात स्ट्राइक होणार आहे की, त्यापेक्षा मोठे? चॅटमध्ये अर्णब दावा करतो की, सरकारला विश्वास आहे की, स्ट्राइक जनतेला खुश करेल.

स्क्रीनशॉट 2: एअर स्ट्राइकनंतर अर्णब म्हणाला - अजून काही व्हायचे आहे
ही चॅट 27 फेब्रुवारीची आहे. यामध्ये BARC चे CEO म्हणतात की, कालची एअर स्ट्राइक तिच आहे का? ज्याविषयी तुम्ही सांगितले होते कि दुसरे काही होणार आहे. याच्या उत्तरानंतर अर्णब म्हणतात अजून काही तरी होणार आहे.

स्क्रीनशॉट 3: पुलवामा हल्ल्याच्या दिवसाला चॅनलचा सर्वात मोठा विजय संबोधले
यामध्ये अर्णब म्हणत आहे की - या हल्ल्यामध्ये आपल्या चॅनलचा सर्वात मोठा विजय आहे. ही चॅट 14 फेब्रुवारीची आहे. यामध्ये अर्णब पुलवामा हल्ल्यादरम्यान कव्हरेजचा उल्लेख करत आहे.

5 ऑगस्ट 2019 ला सरकारने काश्मीरमधून कलम-370 हटवले होते. तीन दिवसांपूर्वीच म्हणजेच 2 ऑगस्टला दासगुप्ता अर्णबला विचारतात की, कलम-370 हटणार आहे. याच्या उत्तरात अर्णब म्हणतात की, मी ब्रेकिंग न्यूजमध्ये प्लॅटिनम स्टँडर्ड सेट केला आहे. ही आमची बातमी आहे. अर्णब चार ऑगस्टच्या चॅटमध्ये काश्मीरमध्ये कलम-144 लावण्याचे बातमी सर्वात पहिले ब्रेक केल्याचा दावा करत आहे.

अर्णबने ऋतिकला बावळट आणि कंगनाला सिजोफ्रेनिया रोगी असे म्हटले
स्क्रीनशॉट 4: यामध्ये अर्णब अॅक्टर ऋतिक रोशन आणि कंगना रनोटविषयी बोलत आहे. अर्णब म्हणतो की, माझ्या नजरेत ऋतिक बावळट आणि कंगना सिजोफ्रेनिया आहे.

दासगुप्ता आजारी, रुग्णालयात नेले
दरम्यान दासगुप्ता यांची तब्येत शनिवारी अचानक खराब झाली. यानंतर त्यांना मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांनुसार, दासगुप्ता डायबिटीजचे रुग्ण आहेत आणि त्याची शुगर लेव्हल वाढली होती. सध्या ते ऑक्सीजन सपोर्टवर आहेत.

बातम्या आणखी आहेत...