आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्णबच्या अटकेवर अमित शहा:'राज्याकडून रिपब्लिक आणि अर्णब गोस्वामी विरोधात सत्तेचा गैरवापर', गोस्वामीच्या अटकेनंतर अमित शाहांचा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अर्णब गोस्वामीच्या अटकेमुळे भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आली आहे. यानंतर भाजपा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहेत. या प्रकरणावर भाजपचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. 'हा लोकशाहीच्या चौथ्या खांबावर हल्ला आहे. यामुळे पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण झाली आहे' अशी प्रतिक्रिया अमित शहांनी दिली.

याविषयी संतप्त होत गृहमंत्री अमित शहांनी ट्विट केले की, 'काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लज्जित केले आहे. राज्याकडून रिपब्लिक आणि अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात होणारा सत्तेचा गैरवापर हा लोकशाहीचा चौथा खांब आणि एका व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण झाली आहे. प्रेसवर झालेल्या या हल्ल्याचा निषेध करायलाच पाहिजे'. अशा शब्दात अमित शहांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

आज सकाळी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामीला राहत्या घरातून अटक केली आहे. यानंतर चौकशीसाठी अलिबागला नेण्यात येणार आहे. अर्णब गोस्वामीच्या अटकेमुळे भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अमित शहा यांनीही या प्रकरणावरून ट्वीट करून ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

अन्वय नाईकांनी सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे अर्णब गोस्वामींचे नाव
अन्वय नाईक यांची मुंबईत 'कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड' या नावाची कंपनी होती. मे 2018 अन्वय नाईक यांनी अलिबाग जवळील आपल्या घरामध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या खिश्यामध्ये एक सुसाईट नोट आढळून आली होती. या नोटमध्ये अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा यांनी आपले पैसे थकवले आहे. यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे तिघांविरोधात आत्महत्येत प्रवृत्त केल्या प्रकरणी अलिबाग पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे देण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापन करण्यात आली होते. यापूर्वी अर्णब गोस्वामी याची याप्रकरणी चौकशी झाली होती. कारवाई झाली नव्हती. आज या प्रकरणात अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आली आहे.