आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्णबची रात्र लॉक-अपमध्ये:अर्णब गोस्वामीच्या जामिनावर मुंबई हायकोर्टात उद्या सुनावणी, 14 दिवसांच्या ज्यूडिशियल कस्टडीमध्ये आहे

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अन्वय यांच्या पत्नी म्हणाल्या - सुशांत केसमध्ये तर सुसाइट नोट नव्हती, पण माझ्या नवऱ्याच्या केसमध्ये तर आहे

रिपब्लिक मीडिया नेटवर्कच्या अर्णब गोस्वामीच्या जामिन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. आता कोर्टात या प्रकरणावर उद्या सुनावणी होणार आहे. यापुर्वी बुधवारी रायगडच्या कोर्टाने अर्णबला 14 दिवसांच्या ज्यूडिशियल कस्टडीमध्ये पाठवण्यात आले होते. दरम्यान बुधवारी त्यांना तुरुंगात शिफ्ट केले जाऊ शकले नाही. अर्णबने रात्र शाळेत घालवली, जेथे अलीबाग स्टेशनमध्ये बंद आरोपींसाठी कोविड सेंटर बनवण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांनी अर्णबला बुधवारी सकाळी त्याच्या घरातून अटक केली होती. अर्णबने मुंबई हायकोर्टात जामिन अर्ज केला आहे. यावर आज सुनावणी होऊ शकते. अर्णबचे वकील पोंडा म्हणाले की, हायकोर्टाने पोलिसांना जबाब मागितला आहे.

अपडेट्स

  • अर्णबच्या अटक प्रकरणात महाराष्ट्र ह्यूमन राइट्स कमीशनने रायगडच्या SP ला नोटीस पाठवून शुक्रवारी सादर करण्यास सांगितले आहे.
  • भाजप आमदार राम कदम यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यांरींना भेटून पोलिसांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

अर्णबला अटक का केली?
मुंबईमध्ये इंडीरियर डिझायनर अन्वय नाइक आणि त्यांच्या आई कुमुद यांनी मे 2018 मध्ये आत्महत्या केली होती. सुसाइड नोटमध्ये अर्णबसह तीन लोकांवर आरोप लावण्यात आले होते. सुसाइड नोटनुसार अर्णब आणि दुसऱ्या आरोपींनी नाइक यांना वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी डिझायनर ठेवले होते, मात्र जवळपास 5.40 कोटी रुपयांचे पेमेंट केले नाही. यामुळे अन्वय यांची आर्थिक परिस्थिती बिघडली आणि त्यांनी आत्महत्या केली.

अन्वय यांच्या पत्नी म्हणाल्या - सुशांत केसमध्ये तर सुसाइट नोट नव्हती, पण माझ्या नवऱ्याच्या केसमध्ये तर आहे
अन्वय यांच्या पत्नी अक्षता यांनी अर्णबच्या अटकेनंतर म्हटले की, '2018 नंतर दोन वर्षे कारवाई का करण्यात आली नाही हे मला माहिती नाही. मी माझा नवरा गमावला आहे. जर त्यांना अर्णब आणि इतर दोन आरोपींकडून पैसे मिळाले असते तर आज माझा नवरा आणि सासू जिवंत असते. सुशांत प्रकरणात तर सुसाइड नोटही नव्हती, तरीही तपास झाला, मात्र माझ्या नवऱ्याच्या प्रकरणात सुसाइड नोटही आहे. महाराष्ट्र पोलिसांनी आता जी कारवाई केली आहे, त्यानंतर आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे.'

अटकेनंतर अर्णबविरोधात अजून एक FIR
अर्णबच्या अटकेच्या 12 तासांमध्येच त्याच्या विरोधात दुसरा केस दाखल करण्यात आला. मुंबईचे NM जोशी पोलिस स्टेशनमध्ये कलम 353 नुसार FIR दाखल करण्यात आला. न्यूज एजेंसी ANI नुसार अर्णबवर महिला पोलिसला मारहाण करण्याचा आरोप आहे. असे बोलले जात आहे की, पोलिस जेव्हा अर्णबला अटक करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची केली.