आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्णबला बेड्या:अर्णब गोस्वामीला मुंबई आणि रायगड पोलिसांकडुून अटक, इंटीरिअर डिझायनर आत्महत्या प्रकरणी कारवाई; पोलिसांवर मारहाणीचे आरोप

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत पोलिस चौकशीसाठी घरी पोहोचले असता पोलिसांसोबत दीड तास घातली हुज्जत

एका आर्किटेक्टच्या आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्याच्या घरी पोहोचले असता, त्याने पोलिसांची दीड तास हुज्जत घातली. त्यामुळे पनवेल पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अर्णब गोस्वामीला केव्हाही अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

2018 मध्ये अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती. काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे देण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापन करण्यात आले होते. यापूर्वी अर्णब गोस्वामी याची याप्रकरणी चौकशी झाली होती. कारवाई झाली नव्हती. आज या प्रकरणात अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आली आहे.