आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमची दसरा रॅली तर त्यांची कचरा रॅली:दसरा मेळाव्यावरुन अरविंद सावंत यांची शिदें गटावर सडकून टीका

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आमची दसरा रॅली तर त्यांची कचरा रॅली आहे, या शब्दात दसरा मेळाव्यावरुन शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. गर्दी होणार नाही हे त्यांना माहिती आहे, असाही टोला त्यांनी लगावला. अरविंद सावंत यांनी मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, दु:ख आणि चीड या गोष्टीची आहे की 2012 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यापुर्वी 2009 च्याआधीपासून उद्धव ठाकरे शिवसेनेचा कारभार पाहत होते. उद्धव ठाकरेंचे त्यांच्यावर उपकार आहेत. ठाकरेनी त्यांना विरोधीपक्ष नेता बनवले. त्यांचे नेतृत्व फुलवले, त्यांना मंत्री केले, पुर्ण मुभा दिली. अशावेळी जगाची नाही तर मनाची तरी असायला हवी होती.

यंदा पाच ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात नेमका कोणी मेळावा घ्यायचा, यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.दसरा मेळाव्यावरुन शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सभा घेण्यास परवानगी न मिळाल्यास शिवेसना कोर्टात जाणार असल्याची माहिती आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा आहे. गेली अनेक वर्ष परंपरेनुसार बाळासाहेब ठाकरेंचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होत आला आहे. बाळासाहेब यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे दसरा मेळावा घेत आले आहेत. यंदाही शिवसेना दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून उद्धव ठाकरेंच्याही शिवसेनेकडून महापालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे.

मेळावा नेमका कोण घेणार
मात्र, यावेळी शिवसेनेत फूट पडली असून एकनाथ शिंदे यांनी बंड करत आमचीच शिवसेना खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आमचा आहे, असेही शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. मुंबई महापालिकेकडे शिंदे गटाकडून स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. तशिंदे गटाचे आमदार मेळाव्याच्या तयारीला लागल्याची माहिती आहे. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कवर हा मेळावा नेमका कोण घेणार, हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.

बातम्या आणखी आहेत...