आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केल्याचे वक्तव्य, खासदार अरविंद सावंत यांनी केले होते. ते आज त्यांनी फेटाळून लावले. मी असे बोललो नाही. हे शब्द माझ्या बोलण्याच्या ओघात निघाले, अशी सारवासारव करत पलटी मारली. त्यामुळे शरद पवार नेमके काय म्हणाले, याची चर्चा चांगलीच रंगली. या प्रश्नाचे उत्तरही खासदार अरविंद सावंत यांनी देत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
मात्र, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा वकूब काय आहे? राज्याचे नेतृत्व प्रगल्भ असावे लागते, असा टोलाही त्यांनी हाणला. शिवाय असाच प्रसंग नारायण राणे यांच्याबाबतही पूर्वी घडला होता, असा दावा त्यांनी केला.
जबाबदारी तुम्ही घ्या...
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, आमच्याकडे दिग्गज लोक आहेत. काँग्रेसमध्ये दोन-दोन मुख्यमंत्री आहेत. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण त्यात आले. बाळासाहेब थोरातांसारखे ज्येष्ठ आमदार, पूर्व मंत्री आहेत. दुसऱ्या बाजूला अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ आहेत. ही सगळी मोठी लोक आहेत. असे असताना एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व कुणी करावे? त्यांचे नाव तुम्ही सुचवू नका. आमचे म्हणणे एवढेच आहे की, तुम्ही ही सगळी जबाबदारी घ्या. ती घेतली, तर हा गाडा व्यवस्थित चालेल, असे शरद पवार म्हणाल्याचे सावंत म्हणाले.
हे तेव्हाच करायचे...
अरविंद सावंत पुढे म्हणाले की, आम्ही काही रणांगणातून पळणारे नाही. मात्र, आम्हाला चीड याची आहे की, हे उद्धव ठाकरे यांना मोहापायी गेले, खुर्चीपायी गेले म्हणतात. मुख्यमंत्री व्हायचे होते, असे धादांत खोटे आरोप करतात. मात्र, गद्दारी करून यांना मुख्यमंत्री दिले. तेव्हा उद्धव म्हणाले की, हेच करायचे तर तेव्हाच करायचे होते. आमचा वादही झाला नव्हता. अडीच वर्षांची गोष्ट चालली होती. मला निरोप दिला. अडीच वर्षे ज्या दिवशी होतील, त्याचा राजीनामा अगाऊ पाठवून देतो.
हा माझा शब्द...
अरविंद सावंत पुढे म्हणाले की, शरद पवार उद्धव ठाकरे यांना म्हणाले की, तुम्हालाच ही जबाबदारी घ्यावी लागेल. तरच हा गाडा चालेल. आम्ही रणांगणातून पळणारे नाही. आम्ही ती स्वीकारली. खुर्चीपायी गेले, हा आरोप खोटा आहे. माझ्या भाषणात ओघातून आलेला शब्द आहे. या रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? हा शरद पवार यांचा शब्द नाही. माझा शब्द आहे. मी स्वीकारतो.
माइक खेचतातच ना...
अरविंद सावंत पुढे म्हणाले की, येथे पेशाचा विषय नाही. अनुभवाचा विषय असतो. ते आजही वाचूका करत आहेत ना. आजही माइक खेचला जातोय ना. कळत ना. म्हणजे तेवढे नेतृत्व प्रगल्भ असावे लागते. वसंत दादा पाटील ही चौथी शिकेलेले होते. मुख्यमंत्री होते. वकूब होता. आजही वकूब आहे का सांगा ना? वकूब असता, तर सर्वोच्च न्यायालयाने या सरकारला नपुंसक म्हटले नसते. असा प्रसंग नारायण राणेंच्या वेळीली आला होता, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.