आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातही लवकरच निवडणुका:अरविंद सावंतांचे भाकीत म्हणाले - प्रकल्प पळवण्यासाठीच गुजरात निवडणुका उशिरा घोषित केल्या

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आज गुजरातेत निवडणुका लागल्या. आता महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुका लागतील. ​​​​​​हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुका एकाच तारखेला घ्यायला हव्या होत्या. परंतु गुजरातची तारीख नंतर घोषित केली. या काळात महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातेत पळवायचे होते म्हणून त्यांनी गुजरातेतील तारीख उशिरा घोषित केली असा आरोप शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी केला. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

घोषणा क्लेशदायक

अरविंद सावंत म्हणाले, कालपर्यंत महाराष्ट्राचा विकास करणारे सर्व प्रकल्प गुजरातला पळवले, महाराष्ट्राचा रोजगार हिरावला. या सर्व घोषणा करताना जनतेला जो अनुभव आला तो दुःखदायक आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकाही लवकरच घोषित करण्याचा हा एक प्रयत्न केंद्राकडून होणार आहे.

शेतकऱ्यांचे काळीज फाटले

अरविंद सावंत म्हणाले, मुख्यमंत्री पत्रकारांना हेलिकाॅफ्टरने घेऊन गावी केले. गाड्यात फिरले. पण आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे काळीज फाटले पण सीएम हेलिकाॅफ्टरने गेले. उद्धव ठाकरे मात्र, दिवाळीच्या दिवशी औरंगाबादेत गेले हा दोघांतील फरक आहे.

प्रसिद्धीसाठी सर्व काही

अरविंद सावंत म्हणाले, शेतकऱ्यांना मदत करणे सोडाच पण मुख्यमंत्री शिंदे प्रसिद्धीसाठी स्टंट करीत आहेत. शेतकरी आत्महत्या करतोय त्याला कुठलाही दिलासा नाही. शेतकरी प्रश्न महत्वाचा आहे, जमले तर तेथेही हेलिकाॅफ्टरने तत्काळ जा आणि मदत करा.

अमलबजावणीचा दुष्काळ

अरविंद सावंत म्हणाले, केंद्र सरकार सर्व गोष्टी करीत आहे. बुलेट ट्रेनची जागा जवळजवळ मोफत घेतली आणि आम्हाला धारावीच्या प्रकल्पासाठी, कांजुरची जागा विकत घ्यावी लागते. राज्यातील प्रकल्पांचे मविआकडून पैसे घेतले. हे जे चालले त्याचा महाराष्ट्रात संताप आहे. प्रकल्पाचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ हे चित्र शिंदे - भाजप सरकारचे आहे.

युतीचे स्वागत करू

अरविंद सावंत म्हणाले, शिवशक्ती- भिमशक्तिचा यापुर्वी प्रयोग झाला. रामदास आठवलेंना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत आणले होते. प्रकाश आंबेडकरांना शिवसेनेचे हिंदुत्व मान्य आहे हे ते आधीच म्हणाले आहेत. आम्ही अजून जवळ आलो नाही, पण विचारधारा जर एकत्र येत असेल तर या युतीचे स्वागत आहे.

बातम्या आणखी आहेत...