आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूझ ड्रग्स प्रकरण:आर्यनने सेशन कोर्टात जामीन अर्ज केला दाखल, उद्या सुनावणी; NCB अचित समोर बसवून करु शकते चौकशी

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनसीबीने अचित कुमारच्या न्यायालयीन कोठडीला विरोध केला नाही

क्रूज ड्रग्स प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये बंद असलेल्या आर्यन खानच्या अडचणी सातत्याने वाढतच आहेत. NCB कोठडीत 6 रात्री घालवल्यानंतर, त्याने दोन रात्री न्यायालयीन कोठडीत काढल्या आहेत, परंतु जामीन मिळण्याबाबत अजूनही अनेक प्रश्न आहेत. त्याचे वकील सतीश मानशिंदे यांनी शनिवारी संध्याकाळी सत्र न्यायालयात त्याची जामीन याचिका दाखल केली होती, परंतु त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. म्हणजेच आर्यनला आणखी एक रात्र आर्थर रोड जेलमध्ये काढावी लागेल.

एनसीबी आर्यनच्या जामिनालाही विरोध करणार आहे. खरं तर, ड्रग्ज प्रकरणात अटक झालेला अचित कुमारही न्यायालयीन कोठडीत आहे. एनसीबी न्यायालयात युक्तिवाद करू शकतो की त्यांना या दोघांची समोरासमोर चौकशी करायची आहे, त्यामुळे आर्यनला जामीन देऊ नये. जर न्यायालयाने एनसीबीचा हा युक्तिवाद मान्य केला तर आर्यनला आणखी काही दिवस तुरुंगात काढावे लागतील.

एनसीबीने अचित कुमारच्या न्यायालयीन कोठडीला विरोध केला नाही
अचित कुमारला अटक केल्यानंतर, जेव्हा NCB ने त्याला न्यायालयात हजर केले, तेव्हा न्यायालयाने त्याला NCB च्या कोठडीत न पाठवता थेट न्यायालयीन कोठडीत पाठवले. आर्यन आधीच न्यायालयीन कोठडीत असल्याने एनसीबीने यावर आक्षेप घेतला नाही. अचित आणि आर्यन एकाच कारागृहात असल्याने, NCB साठी दोघांची एकत्र चौकशी करणे खूप सोपे आहे. या आधारावर, एनसीबी सत्र न्यायालयात आर्यनच्या जामिनाला विरोध करू शकतो.

आर्यनने ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली
शनिवारी आर्यन आणि अरबाज मर्चंटने एनसीबीच्या चौकशीदरम्यान ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली. आर्यन म्हणाला की तो चरस पितो आणि क्रूज पार्टी दरम्यान चरस घेणार होता. एनसीबीने कोर्टात दिलेल्या पंचनाम्यात सांगितले आहे की, तपासादरम्यान अरबाजने शूजमधून ड्रग्सचे पाउच काढले होते. अरबाजकडून 6 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...