आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता शाहरुख खान सध्या 'पठाण' चित्रपटाच्या वादात अडकला आहे. तर, दुसरीकडे त्याचा मुलगा आर्यन खानला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला देण्यात आलेल्या 'क्लीन चिट' विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने फटकारल्यानंतर याचिकाकर्त्याने जनहित याचिका मागे घेतली.
लॉचे विद्यार्थी प्रीतम देसाई यांनी वकील सुबोध पाठक यांच्यामार्फत आर्यन खानला दिलेल्या 'क्लीन चिट'वर प्रश्न उपस्थित केला. तपास यंत्रणेला आर्यनला क्लीन चिट देण्याचा अधिकार नाही. हे फक्त न्यायालयच करू शकते, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचा होता.
कोर्टाचा इशारा -तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल
याचिकाकर्ते प्रीतम देसाई यांच्या पीआयएवरील सुनावणीदरम्यान प्रभारी मुख्य न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला यांचा स्वर चांगलाच कडक होता. त्यांनी पीआयएलचे ‘पब्लिसिटी लिटिगेशन’ म्हणजेच 'प्रसिद्धी याचिका' असे वर्णन केले. देसाई यांना हे प्रकरण त्यांच्याशी कसे संबंधित आहे, हे सिद्ध करण्यास सांगितले. यासोबतच आर्यन खान ड्रग्जचे प्रकरण कसे जनहिताचे आहे? हेही सिद्ध करण्यास सांगितले. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, जर याचिकाकर्ता दाखल केलेला पीआयए सार्वजनिक हिताचा आहे हे सिद्ध करू शकला नाही, तर त्याला मोठी किंमत मोजावी लागेल. उच्च न्यायालयाची अशी कठोर भूमिका पाहून याचिकाकर्त्यांचे वकील पाठक यांनी जनहित याचिका मागे घेतली.
काय आहे प्रकरण?
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली एनसीबी ने 2 ऑक्टोबर 2021 च्या रात्री कॉर्डेलिया क्रूझवर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. याप्रकरणी प्रदीर्घ चौकशीनंतर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना 3 ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे अटक करण्यात आली होती. ही अतिशय हाय प्रोफाईल केस होते.
एनसीबीने पुरावे सादर केले नाही
मुंबई उच्च न्यायालयाने 28 ऑक्टोबर 2022 रोजी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुमुन धमेचा यांना अटींसह जामीन मंजूर केला. “कोर्टासमोर आरोप सिद्ध करण्यासाठी कोणतेही ऑन-रेकॉर्ड सकारात्मक पुरावे सादर केले गेले नाहीत.” असे 14 पानी आदेशात न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी स्पष्ट केले. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यात ड्रग्जशी संबंधित गुन्हा केल्याचा कट रचल्याचा कोणताही पुरावा नाही, असेही मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.