आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूझ ड्रग्स केसमध्ये नवा ट्विस्ट:वानखेडेंवर लाच घेण्याचा आरोप करणाऱ्या प्रभाकर सइलने म्हटले - मला NCB ने चौकशीसाठी बोलावले नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आर्यन खानच्या क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सोमवारी नवा ट्विस्ट आला. समीर वानखेडे आणि केपी गोसावी यांच्यावर लाचखोरीचा आरोप करणाऱ्या प्रभाकर सइलने एनसीबीने चौकशी केली नसल्याचे म्हटले आहे. प्रभाकरचे वकील तुषार एन खंदारे यांनी सोमवारी एनसीबीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की, प्रभाकरला चौकशीसाठी बोलावले तर के कधीही एनसीबी ऑफिसमध्ये जातील.

प्रभाकरने आपल्या वकीलांच्या माध्यमातून पाठवलेल्या चिट्ठीमध्ये म्हटले आहे की, एनसीबीच्या विजलेंस विंगने त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवलेला नाही. त्यांनी लिहिले, 'मला मीडिया रिपोर्ट्सच्या माध्यमातून कळाले आहे की, NCB ने समन्स पाठवून मला चौकशीसाठी बोलावले आहे. मला स्पष्ट करायचे आहे की, मला कोणताही समन्स पाठवण्यात आलेला नाही आणि NCB च्या टीमने माझ्याशी संपर्क देखील केलेला नाही. मला बोलावल्यावर मी तिथे जाईल आणि जबाब दाखल करण्यासह सर्व पुरावे देखील देईल.'

प्रभाकरने लावला होता हा आरोप
आर्यन ड्रॅग्स केसमध्ये प्रभाकर एनसीबीचे स्वतंत्र साक्षीदार आहे. त्याचा दावा आहे की रेडच्या वेळी तो देखील क्रूजवर होता. प्रभाकरने दावा केला होता की NCB ने त्याच्याकडून पंचनामा पेपर असल्याचे सांगून कोऱ्या कागदावर जबरदस्ती स्वाक्षरी घेतली. त्याला आर्यन किंवा कोणाच्याही अटकेविषयी माहिती नव्हती.

प्रभाकरने आरोप लावले होते की, त्याने गोसावीला फोनवर डिसूजाला 25 कोटी रुपयांच्या मागणीविषयी बोलताना ऐकले होते आणि प्रकरण 18 कोटी रुपयांवर ठरले होते. कारण त्यांना आठ कोटी रुपये समीर वानखेडेंना द्यायचे होते.

प्रभाकरच्या आरोपानंतर एनसीबी तपास करत आहे
प्रभाकरच्या आरोपानंतर एनसीबीच्या दक्षता शाखेने 4 सदस्यांची टीम तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. समीर वानखेडे यांनी तपास पथकासमोर हजर राहून स्पष्टीकरण दिले होते. तपासादरम्यान, दक्षता पथकाने मुंबई पोलिसांकडून मदतीचे आवाहन करत, मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून प्रभाकर सइलला एनसीबी दक्षता पथकासमोर हजर करण्याची विनंती केली. दोन दिवस बोलवूनही प्रभाकर हजर झाला नसल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. या प्रकरणात एनसीबीच्या दक्षता पथकाने यापूर्वीच अनेक स्वतंत्र साक्षीदारांची चौकशी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...