आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूझ ड्रग्ज प्रकरण:आर्यन खान प्रकरणाच्या तपासातून समीर वानखेडेंना दूर केले; तर वानखेडे म्हणतात- मला तपासातून काढलेले नाही, मीच विनंती केली होती! मलिक म्हणाले- ही तर फक्त सुरुवात

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्यन खानला तुरुंगात नेणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून काढून टाकण्यात आले आहे. आता आर्यन खानसह ड्रग्जशी संबंधित 6 प्रकरणांचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे, ज्याचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय सिंह करणार आहेत.

मला तपासातून काढलेले नाही- वानखेडे
मला चौकशीतून काढून टाकण्यात आलेले नाही. या प्रकरणाची केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशी व्हावी, अशी मीच न्यायालयाला विनंती केली होती तशी याचीका दिली होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाची दिल्ली एनसीबीची एसआयटी चौकशी करत आहे.

खंडणीसह बनावट कास्ट सर्टिफिकेटचा आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारीही या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचवेळी, एनसीबीचे दक्षिण पश्चिम विभागाचे उपमहानिदेशक मुथा अशोक जैन म्हणाले की, आमच्या झोनमध्ये आर्यनसह एकूण 6 प्रकरणांची चौकशी आता दिल्लीच्या टीमकडून केली जाईल.

राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंना ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून काढून टाकल्याबद्दल सांगितले - वानखेडेंना आर्यनसह पाच प्रकरणांमधून काढून टाकण्यात आले आहे. या प्रकरणी 26 प्रकरणांची चौकशी व्हायला हवी. ही सुरुवात आहे. यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी अनेक पावले उचलणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...