आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण आहे मुनमुन?:आर्यन खानसोबत ड्रग्स प्रकरणात पकडल्या गेलेली मुनमुन; पार्ट्यांमध्ये दिसणारी मॉडेल बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांमध्ये ओळख

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ड्रग्स प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानसह दिल्लीची असलेली मुनमुन हिला सुद्धा 7 ऑक्टोबर पर्यंत NCB कोठडी देण्यात आली आहे. ड्रग्स पार्टीमध्ये सामिल असल्याचे तिच्यावर आरोप आहेत. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तिच्याकडून 5 ग्रॅम ड्रग्स सापडले आहे. अशात आर्यनसोबत चर्चेत आलेली मुनमुन नेमकी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मुनमुन धामेचा एक मॉडेल असून ती अनेक पार्ट्यांमध्ये सेलिब्रिटींसोबत दिसून येते. गुरू रंधावा, सुयश रॉय आणि अर्जुन रामपाल यांच्यासारख्या स्टार्समध्ये मुनमुन एक चर्चित नाव आहे.

मुनमुन मूळची मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिची शाळा सागर येथे होती, तर माध्यमिक शिक्षणासाठी ती भोपाळला शिफ्ट झाली होती. आता तिच्या कुटुंबातील कुणीही सागर जिल्ह्यात राहत नाही. मुनमुनच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वीच तर आईचे गेल्या वर्षी निधन झाले. 2014 पासून ती आपल्या एका भावासोबत दिल्लीत राहते. या ठिकाणी तिचा भाऊ एका खासगी कंपनीत महत्वाच्या पदावर आहे.

जाहिरातींमध्ये मॉडेलिंग
मुनमुन गेली 6 वर्षे आपल्या भावासोबत आहे. येथे ती एक मॉडेल म्हणून काम करते. सोशल मीडियावर ती नेहमीच सक्रीय असते. इंस्टाग्रामवर तिचे 11 हजार फॉलोअर्स आहेत. तिने काही जाहिरातींमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावरील फोटो पाहून ती पार्ट्यांची शोकीन असल्याचे दिसून येते. बॉलिवूडमध्ये अनेक मोठे स्टार्स तिचे मित्र असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, एनसीबीला तिच्याकडे 5 ग्रॅम ड्रग्स सापडले होते. त्यानुसार तिच्या विरोधात NDPS कायद्याच्या कलम 8(c), 20(b), 27 आणि 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...