आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा चौथा दिवस:आर्यन खानचा फोन फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला, NCBला यात अनेक सुगावे सापडले; वर्सोवा येथून आणखी एक ड्रग पेडलरला अटक

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनसीबीने या प्रकरणात आतापर्यंत एकूण 16 जणांना अटक केली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) आर्यन खान ड्रग प्रकरणात आणखी 8 जणांना अटक केली आहे. यापैकी दिल्लीतील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे 4 हाय प्रोफाइल आयोजक सहभागी आहेत. याच कंपनीला 2 ते 4 ऑक्टोबर दरम्यान क्रूझ पार्टी आयोजित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या व्यतिरिक्त, मंगळवारी अटक केलेल्या इतर 4 लोकांमध्ये आर्यनचा मित्र आणि एक ड्रग पेडलरचा समावेश आहे.

एनसीबीने या प्रकरणात आतापर्यंत एकूण 16 जणांना अटक केली आहे. आज क्रूझमधून अटक केलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या इतर 4 लोकांसमोर बसून आर्यनची चौकशी केली जाऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, एनसीबीला आर्यनच्या फोनमधून यांचा सुगावा मिळाला होता.

एनसीबी आर्यनचा फोन फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला
पुरावे गोळा करण्यासाठी एनसीबीने आर्यनचा फोन क्लोन करून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना व्हॉट्सअॅप चॅट्सद्वारे ड्रग्जविषयी अनेक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. यामध्ये काही आक्षेपार्ह फोटोंचाही समावेश आहे. गांधी नगर येथील देशातील सर्वात मोठ्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी केल्यानंतर, या फोनमुळे आणखी गुपिते उघड होण्याची अपेक्षा आहे. आर्यन 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या ताब्यात आहे.

आर्यनला इतर आरोपींप्रमाणे अन्न दिले जात आहे
शाहरुख खानचा मुलगा आर्यन सध्या एनसीबी लॉकअपमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यनने मंगळवारी तपास संस्थेकडून काही विज्ञान पुस्तके मागितली होती, जी अधिकाऱ्यांनी दिली आहेत. एनसीबी कार्यालयाजवळील राष्ट्रीय हिंदू रेस्तरॉमधून आर्यनसाठी जेवण आणले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही आरोपीला एनसीबी कार्यालयात घरून त्याच्या आवडीचे जेवण मागवण्याची परवानगी नाही. NCB कोठडीत दोन्ही वेळा सर्व आरोपींना एकत्र जेवण दिले जाते.

मुंबईच्या वर्सोवा परिसरातून आणखी एका ड्रग पेडलरला अटक
एनसीबीने आज सकाळी मुंबईच्या वर्सोवा भागातून आणखी एका ड्रग पेडलरला पकडले आहे. श्रेयस नायरच्या सांगण्यावरून त्याला ताब्यात घेतले आहे. NCB थोड्या वेळात त्याच्या अटकेची पुष्टी करू शकतो. क्रूझवर रेव्ह पार्टी आयोजित करणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या चार अटक आरोपींना आज फोर्ट कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...