आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरण:आर्यन खानला आजची रात्रदेखील तुरुंगातच काढावी लागणार, जामीन अर्जावर आता उद्या होणार सुनावणी, उद्या जामीन न मिळाल्यास पुढील पाच दिवस तुरुंगातच काढावे लागू शकतात?

मुंबई12 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • आर्यनच्या जामीन अर्जावर आज पुन्हा सुनावणी; शाहरुखने यासाठी प्रसिद्ध वकील अमित देसाई यांची नेमणूक केली, एका प्रकणात देसाईंनी सलमानची केली होती निर्दोष मुक्तता
 • NCB म्हणाले - खान एक प्रभावशाली व्यक्ती आहे आणि पुराव्यांशी छेडछाड करू शकतो

क्रूझ ड्रग प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला आजही दिलासा मिळालेला नाही. त्याला आजची रात्रदेखील तुरुंगातच काढावी लागणार आहे. सत्र न्यायालयाने आजची सुनावणी तहकूब केली असून आता उद्या दुपारी 12 वाजता जामीन अर्जावर पुढील सुनावणी होणार आहे.

उद्या जामीन न मिळाल्यास पुढील पाच दिवस तुरुंगात काढावे लागतील?

आर्यनच्या जामीन अर्जावर गुरुवारी पुढील सुनावणी होणार आहे. पण उद्या जर आर्यनला जामीन मंजुर झाला नाही तर त्याला पुढील पाच दिवस तुरुंगात काढावे लागू शकतात. कारण पुढील पाच दिवस न्यायालयाला सुटी आहे. अशा परिस्थितीत आर्यनच्या अर्जावरील सुनावणी पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आज दुपारी सुनावणीला सुरुवात

आर्यनच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात दुपारी 2.45 वाजता सुनावणीला सुरुवात झाली होती. या सुनावणीपूर्वी एनसीबीने विशेष एनडीपीएस न्यायालयात आपले उत्तर दाखल केले. यामध्ये एनसीबीने आर्यनच्या जामिनाला विरोध करत म्हटले आहे की, 'एका आरोपीची भूमिका दुस -यापासून वेगळी करता येत नाही. आरोपीकडून कोणतेही साहित्य मिळालेले नाही, तरीही तो या संपूर्ण कटात सामील आहे

एनसीबीने आपल्या उत्तरात आर्यनला 'प्रभावशाली व्यक्ती' म्हटले आहे. तो पुराव्यांशी छेडछाड करु शकतो, असे एनसीबीचे म्हणणे आहे. एनसीबीने स्पष्ट केले आहे की, आरोपी अचित कुमार आणि शिवराज हरिजन यांनी आरोपी आर्यन खान आणि अरबाज मर्चंटला चरस पुरवला होता. आर्यन आणि अरबाज एकमेकांशी संबंधित आहेत.

एनसीबीने पुढे सांगितले की, आमच्या रेकॉर्डमध्ये असे साहित्य आहे जे दर्शवते की आर्यन खान परदेशातील काही लोकांच्या संपर्कात होता. आम्ही परदेशातील व्यवहारांशी संबंधित प्रकरणाची चौकशी करत आहोत. तपास अजून सुरू आहे.

ते सर्व तरुण आहेत, पेडलर नाहीत: आर्यनचे वकील

यानंतर, आर्यनचे वकील अमित देसाई यांनी NCB च्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सांगितले की, केंद्रीय तपास यंत्रणा 4 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय तस्करीबद्दल बोलली होती आणि आज 13 तारीख आहे,या दरम्यान तपास यंत्रणेने काहीही केले नाही. ते म्हणाले की, आर्यनला पार्टीमध्ये आमंत्रित करणाऱ्या प्रतीकला पोलिसांनी अटक केली नाही.

देसाई म्हणाले की, सर्व आरोपी तरुण आहेत. ते कोठडीत आहेत आणि त्यांना त्यांचा धडा मिळाला आहे. त्यांनी खूप त्रास सहन केला आहे. तो पेडालर नाही. देसाई म्हणाले की, अनेक देशांमध्ये या पदार्थाला कायदेशीर मान्यता आहे.

चॅटवरुन समजतं की मोठ्या प्रमाणात ड्रग्जची खरेदी केली गेली
अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग म्हणाले की, चॅटमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज खरेदी केल्याचे दिसून येते. मला या ड्रग्जबद्दल माहिती नाही, पण माझ्या अधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे की ते खूप धोकादायक ड्रग्ज आहेत.

एएसजीने सांगितले की, अचित कुमार (आर्यनच्या वक्तव्यानुसार) एक ड्रग पेडलर आहे. चिनेदू इग्वे (नायजेरियन), शिवराज हरिजन, अब्दुल कादिर शेख आणि आणखी एक नायजेरियन नागरिकही यात सामील असल्याचे आढळून आले आहे. ड्रग्जच्या वैयक्तिक वापरासाठी असे संवाद होऊ शकत नाहीत. आम्ही परराष्ट्र मंत्रालयाला विचारले आहे की, आम्ही परदेशी नागरिकांपर्यंत कसे पोहोचू शकतो.

न्यायालयाने यापूर्वी दोन वेळा आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला होता.
न्यायालयाने यापूर्वी दोन वेळा आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला होता.

सलमानच्या वकिलांनी घेतले आर्यनचे वकीलपत्र

क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात आर्यन 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. शाहरुखने आर्यनसाठी अमित देसाई या मुंबईतील प्रसिद्ध वकिलाची नियुक्ती केली आहे. सतीश मानेशिंदे यांच्यासह ते या प्रकरणाची वकिली करतील. 2002 मध्ये देसाई यांनी हिट अँड रन प्रकरणात सलमान खानची निर्दोष मुक्तता केली होती. आर्यनचा जामीन अर्ज यापूर्वी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्ट अर्थात किला कोर्टाने फेटाळला आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात, एनसीबीने आर्यनसह 20 लोकांना अटक केली आहे, ज्यात दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

आर्यनच्या भूमिककडे दुर्लक्ष करता येणार नाही
आर्यनच्या जामिनाला विरोध करताना एनसीबीने म्हटले की, 'एका आरोपीची भूमिका दुस -यापासून वेगळी करता येत नाही. आरोपीकडून कोणतेही साहित्य मिळालेले नाही, तरीही तो या संपूर्ण कटात सामील आहे. आर्यन खानवर प्रतिबंधित साहित्य खरेदी केल्याचा आरोप आहे. अरबाजकडे बंदी असलेले ड्रग्ज सापडले. आम्ही परदेशातील व्यवहारांशी संबंधित प्रकरणाची चौकशी करत आहोत.'

आर्यन जामीन अपडेट

 • आर्यनचे वकील पुढे म्हणाले की, विक्रांत चोकर कोकेनसह पकडला गेला. कथितरीत्या चोकरकडून चरस सारखा पदार्थही जप्त करण्यात आला. त्यांना इश्मीत सिंगकडून 15 गुलाबी रंगाच्या गोळ्या सापडल्या. मग त्यांनी आणखी एक छापा टाकला जिथे विक्री आणि खरेदीसाठी पैसे ठेवण्यात आले होते. आणखी दोन लोकांना, ज्यांचा तपशील संशयितांच्या माहितीशी जुळत होता, त्यांना एनसीबीने टर्मिनलवर अडवले. ते होते आर्यन खान आणि अरबाज मर्चंट.
 • आर्यनचे वकील अमित देसाई यांनी न्यायालयाला सांगितले की, पंचनाम्यानुसार आयओने विचारले की तुमच्याकडे ड्रग्ज आहेत का? त्यांनी चरस असल्याचे मान्य केले. मर्चंटने कबूल केले की, तो खानसोबत चरसचे सेवन करत होता. खानला विचारल्यावर त्यानेही चरस घेतल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी ड्रग्ज जप्त करून सीलबंद केले.
 • देसाई पुढे म्हणाले की, यावेळी आम्ही फक्त जामिनाबद्दल चिंतिंत आहोत. संपूर्ण घटना 2 ऑक्टोबरच्या दुपारी सुरू होते, जेव्हा आर्यनला क्रूझ शिपवरील पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्याला एका माणसाने आमंत्रित केले होते जो आयोजक असू शकत नाही, तो म्हणजे प्रतीक गब्बा ... पण त्याला अटक करण्यात आलेली नाही.
 • आर्यन त्याचा मित्र मर्चंट सोबत क्रूझवर गेला होता. तो चेक-इन करत असताना त्याला एनसीबीने अडवले. एनसीबीच्या मते, जे घडले ते पंचनाम्यात आहे. आता आपण पंचनाम्यात काय लिहिले आहे त्यानुसार जाऊया. एनसीबीच्या टीमने नंतर टर्मिनलवर चौकशी करण्यास सुरुवात केली आणि या दरम्यान त्यांना असे दोन लोक सापडले, ज्यांना ते शोधत होते. त्यांनी विक्रांत आणि इश्मीतची चौकशी केली. एनसीबीला त्यांच्याकडे काही ड्रग्ज मिळाले. फक्त रेकॉर्डसाठी, ते MD होते, आणि ते 5 ग्रॅम आहे.
 • एनसीबीने सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजची प्रासंगिकता ट्रायलच्या वेळी निश्चित केली जाईल. तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात असून तपास अजूनही चालू आहे. अशी मागणी चालू असलेल्या तपासावर मोठा विपरीत परिणाम करेल.
 • एनसीबीने म्हटले आहे की, अर्जदाराविरुद्ध (आर्यन खान) गुन्ह्यातील सर्व घटकांचे म्हणजे तयारी, हेतू, प्रयत्न आणि कमिशन यांचे पुरावे आहेत. त्यामुळे त्याला खोटे फसवण्याचा आरोप चुकीचाच नाही तर दिशाभूल करणारा आहे. छायाचित्रांपासून ते व्हॉट्सअॅप चॅटच्या स्वरूपात पुरेसे पुरावे आहेत.
 • एनसीबीने पुढे म्हटले की, पंचनाम्यातून स्पष्टपणे दिसते की, खान आणि मर्चंट यांना आंतरराष्ट्रीय क्रूझ ग्रीन गेट मुंबईवर पकडण्यात आले होते. म्हणूनच आरोपींनी एमव्ही एम्प्रेस कार्डशिवाय क्रूझमध्ये कसा प्रवेश केला याचा तपास करणे आवश्यक होते.
 • आर्यन खानच्या जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान, अनेक चाहते पुन्हा एकदा शाहरुखच्या मन्नत बंगल्यासमोर आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी जमले आहेत.
 • नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खान आणि इतर आरोपींच्या जामीन अर्जावर संबंधित वकिलांना त्यांच्या उत्तराच्या प्रती दिल्या आहेत. तसेच, एनसीबीने शाहरुखचा मुलगा आर्यन आणि सर्व आरोपींच्या जामिनाला विरोध केला आहे.
 • आर्यनच्या जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान, दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे कौटुंबिक वकील विकास सिंह यांनी एनसीबीवर आरोप केले आहेत. विकास सिंह म्हणतात की, 'एनसीबीने आर्यन खानला अटक करुन सुशांतच्या प्रकरणापासून लोकांचे लक्ष हटवले आहे. माझी मागणी आहे की, सीबीआयने आत्तापर्यंत काय केले ते लवकरात लवकर सांगावे.'
 • सतीश मानेशिंदे म्हणाले- आम्ही NCB च्या उत्तराची वाट पाहत आहोत.
 • यावर न्यायालयाने म्हटले - एनसीबी कुठे आहे?
 • मानेशिंदे - काही वेळापूर्वी मी एनसीबीचे वकील चिमणकर यांना न्यायालयात पाहिले. या संभाषणानंतर एनसीबीच्या वकिलांना पाचारण करण्यात आले.
 • एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आजच्या सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी एनसीबी कार्यालयात पोहोचले आहेत.
 • शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीने विशेष एनडीपीएस न्यायालयात अर्ज दाखल केला असून, तिने आर्यनचा प्रतिनिधी म्हणून सुनावणीला उपस्थित राहण्यास परवानगी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली आहे.
 • न्यायालयाने पूजा ददलानीची विनंती मान्य केली आहे, त्यानंतर तिने न्यायालयाच्या आत प्रवेश केला.
शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी सेशन कोर्टात पोहोचली आहे.
शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी सेशन कोर्टात पोहोचली आहे.

NCB जामिनाला विरोध करेल
11 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान, एनसीबीने या प्रकरणी न्यायालयाकडे एक आठवड्याचा वेळ मागितला होता. न्यायालयाने बुधवारपर्यंत म्हणजेच आजपर्यंत एनसीबीला वेळ दिला होता. NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे म्हणतात की, आम्ही आणि फिर्यादी प्रयत्न करू की केस निष्कर्षापर्यंत पोहोचेल, आमची केस मजबूत आहे आणि आम्ही ते कोर्टात सादर करू. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबी आर्यनच्या जामिनाला विरोध करेल, असे सांगून की या प्रकरणात अटक केलेल्या इतर काही आरोपींसमोर आर्यनची चौकशी केली जाईल.

आर्यन प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाबाहेर गर्दी जमलेली दिसत आहे.
आर्यन प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाबाहेर गर्दी जमलेली दिसत आहे.

तुरुंगात आर्यनचा सहावा दिवस
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 8 ऑक्टोबरपासून ड्रग्ज प्रकरणात आर्थर जेलमध्ये आहे. आर्यनला 2 ऑक्टोबर रोजी त्याचा मित्र अरबाज मर्चंटसह मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ शिपवर एनसीबीने ताब्यात घेतले होते. एनसीबीला आर्यनकडून कोणतेही ड्रग्ज मिळाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र आर्यनने चौकशीदरम्यान ड्रग्जचे सेवन करत असल्याची कबुली दिली होती. तर दुसरीकडे मित्र अरबाज मर्चंटने त्याच्या शूजमध्ये चरस लपवल्याची माहिती समोर आली होती.

बातम्या आणखी आहेत...