आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाविकास आघाडीची टीका:मुख्यमंत्री शिंदे अन् सरन्यायाधीश एका व्यासपीठावर आल्याने वादंग, मुख्यमंत्र्यांनी संकेत पायदळी तुडवले

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी एकाच व्यासपीठावर हजेरी लावल्याने नवा वाद उद्भवला आहे. शिंदे गट आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्यास हजेरी लावून संकेत पायदळी तुडवले असल्याची टीका महाविकास आघाडीने केली आहे.

नवनियुक्त सरन्यायाधीश उदय लळीत यांचा मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने शनिवारी ताज महाल हॉटेलमध्ये सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास मुख्यमंत्री शिंदे आणि सरन्यायाधीश एकाच व्यासपीठावर होते. याप्रसंगी महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल. त्यांचा गाढा अनुभव, नैपुण्य, ज्ञान यामुळे ते न्याय क्षेत्रासाठी निश्चितच दीपस्तंभ ठरतील, या शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावरून हा वाद पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सरकारच्या वैधतेची सुनावणी सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी सरन्यायाधीशांसोबत एकाच व्यासपीठावर बसणे संकेतांना धरून नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर केली आहे.

व्यासपीठावरील विसंगती उठून दिसते : काँग्रेस शिंदे सरकारची वैधता तपासली जात असताना सध्याचे सरकारच नाही तर राज्याचे नेतृत्व करणारी व्यक्तीही अपात्र ठरवली जाऊ शकते, अशी परिस्थिती असताना व्यासपीठावरील विसंगती उठून दिसते, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...