आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुलाखत:देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिलाय म्हणून... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विरोधीपक्ष नेत्यावर टीकास्त्र

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभ्यास न करता फिरणं आणि न फिरता अभ्यास करणं यात तुम्हाला काय पाहिजे

शिवसेना खासदार आणि सामना या वृत्तपत्राचे कार्याकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अनलॉक्ड मुलाखत घेतली. ही मुलाखत आह प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीसांवरही फटकेबाजी केली आहे. फडणवीर नुकतेच दिल्लीला गेले होते. यावरुन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

दिल्लीत जाऊन विरोधी पक्षनेते महाराष्ट्राच्या भयावह परिस्थितीबद्दल बोलले आहेत असल्याचे संजय राऊत म्हणाले. याचे उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांनी त्यांचा जो आमदारकीचा फंड आहे, तो महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिल्यामुळे सगळय़ा गोष्टी ते दिल्लीत जाऊन करत आहेत असा टोला त्यांनी लगावला. या वक्तव्यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या पीएम केअर्स या कोरोना मदतनिधीसाठी महाराष्ट्र भाजपाने राबवलेल्या मोहिमेवर उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे.

अभ्यास न करता फिरणं आणि....
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवरुन फडणवीसांवर भाष्य केले आहे. सध्या देवेंद्र फडणीस हे राज्यभरात दौरे करत आहे. कोरोना स्थितीची पाहणी करत आहे. यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. ठाकरे म्हणाले की, मी फिरत नाही, घरी बसतो म्हणून अभ्यास होतो. अभ्यास न करता फिरणं आणि न फिरता अभ्यास करणं यात तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही ठरवा. असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधीपक्ष नेते फडणवीसांना टोला लगावला आहे.