आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ कोटींच्या बनावट नोटा जप्त:ठाण्यात 2000 च्या नोटांची तब्बल 400 बंडल सापडले

ठाणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट नोटा हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकारने नोटाबंदी केली. मात्र, या निर्णयाच्या ६ वर्षांनंतर बनावट नोटांचा पुन्हा सुळसुळाट झाल्याचे दिसत आहे. शनिवारी ठाणे जिल्ह्यात तब्बल ८ कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्या. ठाणे शहर पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पालघर येथील राम शिंदे व राजेंद्र राऊतला अटक करण्यात आली आहे.

ठाणे पोलिसांनी कासारवडवली येथून दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून २००० च्या बनावट नोटांची तब्बल ४०० बंडल जप्त करण्यात आले आहेत. या बनावट नोटांची बाजारातील किंमत जवळपास ८ कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. माहितीनुसार, आरोपी या सर्व बनावट नोटा बाजारात चलनात आणणार होते. जवळपास सर्वच नोटा २ हजारांच्या आहेत. पोलिसांनी २ आरोपींना अटक केली असली, तरी या प्रकरणाचा मास्टरमाइंड कुणीतरी वेगळा आहे व त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक केलेल्या दोन्ही आरोपींविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४८९ (अ), ४८९ (ब), ४८९ (क) आणि ३४ अंतर्गत कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...