आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अयोध्या राम मंदिर:जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर पवार साहेबांचा राग पण वाढतोय, निलेश राणे यांची बोचरी टीका

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बातमीची हेडिंग वाचली तेव्हा वाटलं एमआयएम पक्षाचा ओवेसी बोलतोय नंतर पवार साहेबांचं नाव दिसलं

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या कार्यक्रमासाठी अनेक राजकीय नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात येत आहे. निमंत्रितांची यादीही तयार करण्यात येत आहे. अशात राम मंदिराच्या भूमिपूजनाचे आमंत्रण मिळाले तरी जाणार नाही, असे शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांच्या या वक्तव्याचा भाजप नेते निलेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला. जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर पवार साहेबांचा राग पण वाढतोय, अशा शब्दात राणे यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी ट्विटवरून साधला निशाणा

''बातमीची हेडिंग वाचली तेव्हा वाटलं एमआयएम पक्षाचा ओवेसी बोलतोय नंतर पवार साहेबांचं नाव दिसलं… एवढं मात्र खरं पवार साहेबांचं वय बघून कोण काय बोलत नाही, पण जसं जसं वय वाढतंय तसा हिंदू धर्मावर पवार साहेबांचा राग पण वाढताना दिसतोय, असे ट्विट करत निलेश राणे यांनी पवारांवर टीका केली आहे.

काय म्हणाले होते शरद पवार ?

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले होते की, भूमिपूजन सोहळ्याचे निमंत्रण मिळाले तरी मी अयोध्येला जाणार नाही. सध्या कोरोनाची गंभीर स्थिती आहे. अशा परिस्थितीत राज्यातच राहणे महत्त्वाचे आहे. राज्याच्या हिताचीही जबाबदारी मोठी आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले होते. शरद पवारांच्या या वक्तव्याने भाजपने आता त्यांना चांगलच धारेवर धरले आहे.