आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एसईबीसी प्रवर्गातील (सामाजिक व शैक्षणिक मागास) उमेदवारांना ईडब्ल्यूएसचे (आर्थिक दुर्बल घटक) लाभ देण्याबाबत प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याबद्दल मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर मुख्य सचिव संजयकुमार यांनी सर्व विभागांना बुधवारी खरमरीत पत्र पाठवून याबाबतचा अनुपालन अहवाल दर आठवड्याला पाठवण्याची तंबी दिली आहे.
मराठा समाजातील अनेक उमेदवारांनी याबाबत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. मंगळवारी झालेल्या उपसमितीच्या बैठकीत चव्हाण यांनी या प्रकाराबद्दल असंतोष व्यक्त केला होता. मंगळवारी रात्री त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा संपूर्ण प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. प्रशासनाच्या वेळकाढूपणाने विरोधकांना सरकारवर निशाणा साधण्याची संधी मिळत असल्याचे चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार मुख्य सचिव संजयकुमार यांनी अखत्यारीतील सर्व विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी तंबी दिली आहे.
या ठिकाणी मिळणार लाभ शासकीय विभाग, मंडळे, महामंडळे, निमशासकीय विभाग, विद्यालये, खासगी शिक्षण संस्था, महाविद्यालये, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा अशा विभागातील शैक्षणिक प्रवेश आणि सरळ सेवा भरतीत एसईबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.