आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:आशा स्वयंसेविकांना दरमहा 2 हजार रुपयांचा मोबदला, काम बंद आंदोलन संपवा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आशा स्वयंसेविकेस दरमहा २ हजार व गट प्रवर्तकांना दरमहा ३ हजार रुपये मोबदला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोरोनाविरोधात लढताना ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानाचा सर्व्हे करण्यास आशांनी नकार देऊन बहिष्कार टाकला होता. सर्व्हेकरिता ३०० रुपये द्यावे, अशी मागणी आयटकने केली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने मोबदला देण्याचा निर्णय घेतला.

२८ सप्टेंबरपासून प्रस्तावित काम बंद आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. केंद्राने दरमहा मंजूर केलेल्या १ हजार रुपयांव्यतिरिक्त दररोज १५० रुपये इतका मोबदला अदा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

शासन निर्णय निर्गमित, लवकरच मोबदला
मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना सेवांवर आधारित मोबदला मिळतो. कामाची दखल घेऊन शासनाने आशा स्वयंसेविकेस दरमहा २ हजार आणि गट प्रवर्तकांना दरमहा ३ हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. तसा शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निधीची तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये केली आहे.