आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंना नोटीस पाठवण्यावरुन राऊतांना शेलारांचा इशारा:'तुमच्या वक्तव्यावर दावे दाखल झाल्यास कोर्टात स्वतःचे घर बांधावे लागेल'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नारायण राणे म्हणतात 2004 साली त्यांनी मला खासदार केले. माझी नेमणूक करण्यासाठी नारायण राणे हे शिवसेना प्रमुख होते का? असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राणे यांना विचारला आहे. नारायण राणे यांनी माफी मागितली नाही तर न्यायालयात खटला दाखल करणार असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. त्यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊतांवर दावे दाखल झाले तर त्यांना स्वतःचे घर कोर्टात बांधावे लागेल असा इशारा आज दिला.

काय म्हणाले होते संजय राऊत

संजय राऊत म्हणाले, आता ती वेळ आली आहे. कायदेशीर लढाई लढू. नारायण राणे म्हणाले की, 2004 साली त्यांनी मला खासदार केले. माझी नेमणूक करण्यासाठी नारायण राणे हे शिवसेना प्रमुख होते का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यावेळी काय करत होते? आता नारायण राणेंनी बाळासाहेबांची शिवसेनाप्रमुख म्हणून मीच निवड केली हे सांगणे बाकी आहे. अशी टीका संजय राऊत यांनी केली.

आरोप सिद्ध करा

संजय राऊत म्हणाले, राणे खोट बोलत आहेत. त्यांनी मतदार यादीतील माझा फॉर्म पाहावा. मला आता त्याविषयी काही बोलायचे नाही. त्यांनी माफी मागितली नाही तर न्यायालयात खटला दाखल करणार आहे. शिवसेनेचे सर्वच नेते असे खटले दाखल करणार आहे. त्यांनी जे आरोप केलेत, ते सिद्ध करावे. तुम्ही केंद्रात मंत्री आहात देश लुटला गेलाय. त्यावर हे बोलताय का?

आशिष शेलारांचे प्रत्यूत्तर

आशिष शेलार संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले की, संजय राऊतांनी लक्षात घ्यावे की, तुम्हाला नोटीस पाठवण्याचे अधिकार आहे. पण तुमचे बोलणे, शिवराळ भाषा, मराठा समाजांसह अन्य लोकांवरील वक्तव्ये तसेच नर्स, डाॅक्टरांबाबत वक्तव्य त्यांनी केले होते. त्यावर जर दावे दाखल झाले तर एखाद्या न्यायालयातच स्वतःचे घर बांधावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...