आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पटोलेंनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला:आशिष शेलारांचा आरोप; भाजपने कधीच अपमानास्पद वागणूक दिली नसल्याचा दावा

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिवसेनेला पाण्यात पाहतात. महाविकास आघाडीमध्ये आता रस्सीखेच सुरू झाली असून, पळवापळवीचे चित्र आहे. स्वत:च्या नेत्यांची समजूत घालत नसतील, तर राज्याच्या जनतेला काय न्याय मिळणार, असे सांगायलाही शेलार विसरले नाहीत.

आम्ही चांगलेच वागवले

शेलार म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत नाना पटोले यांच्या काँग्रेसने शिवसेनाच्या पाठीत खंजीर खुपला आणि आता विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी शिवसेनेची मते पळवत आहे. तर शिवसेना आपल्या आमदारांवर विश्वास व्यक्त करत आहे. शिवसेना जेव्हा आमच्यासोबत होती तेव्हा त्यांना अशी वागणूक कधीच दिली नाही.

भाजप - ठाकूरांची भेट

बहुजन विकास आघाडीच्या तीन मतांसाठी सर्वच पक्ष हितेंद्र ठाकूर यांची भेट घेत आहेत. भाजपचे विधान परिषदेसाठीचे उमेदवार प्रसाद लाड यांनी देखील आज हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आहे. मुंबईच्या विरारमधील कार्यालयात भाजपच्या शिष्टमंडळांनी आज ठाकूर यांच्याशी चर्चा केली.

बातम्या आणखी आहेत...