आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपने आपल्या बुस्टर सभेत बाबरी मशीद पाडण्याच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. राम मंदिर आंदोलनात शिवसेना कुठे होती ? असा थेट सवाल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापले. त्यानंतर शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी फडवीसांना प्रत्युत्तर दिले. बाबरीच्या वेळी शिवसेना कुठे होती, हे तुमच्या नेत्यांना विचारा असा टोला राऊतांनी फडणवीस यांना लगावला. यावरुन आता भाजपा आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नदोष झाल्याचा आरोप करत असाल तर शिवसेनेच्या नेत्यांना बुद्धीदोष झाला आहे. या बुद्धीदोषाचे उत्तर ठाण्याला आहे. तिथे संजय राऊत यांनी जाऊन यावे, अशी टीका आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर केली.
श्रेय घेण्याच्या भानडीत गडबड करु नका -
बाबरी मशिदीशी काय संबंध. आंदोलन हे साधू संतानी, हिंदू समाजाने सुरु केल्याचे अख्ख्या जगाला माहिती आहे. तुमचा जन्मच 1960 नंतरचा आहे आणि हे आंदोलन त्याआधी सुरु झाले. जन्म होण्याआधी मी कारसेवेला होतो म्हणणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद ही नावं तरी माहिती आहेत का यांना. उगाच श्रेय घेण्याच्या भानडीत ही गडबड करु नका. आज बोलणाऱ्यांनी तोंड बंद करावीत. तुमच्या नावावर साधा गुन्हा दाखल नाही. त्यानंतर झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत तुमचा आईसक्रीम खाण्याचा कार्यक्रम चालू आहे. त्यामुळे तुम्ही त्यांचे समर्थक आहात आणि त्यामुळे याबाबत बोलू नका, असे आशिष शेलार म्हणाले.
व्हॅट कमी करा -
पेट्रोलच्या विषयावर भाजपानेच काम केले आहे. भाजपाच्या सरकारने देशात पेट्रोलच्या करात सवलत दिली आहे. जेव्हा पंतप्रधान मोदींनी याची आठवण करुन दिली, मग त्यावेळी पळ का काढता? स्वतःच्या सरकारला कर कमी करण्यास सांगा. जगामध्ये युद्ध सुरु असतानाही कोणत्याही दबावाला बळी न पडता पंतप्रधानांनी रशियाकडून क्रुड ऑईल घेतले. त्याबद्दल तुम्ही एकतरी वाक्य काढलं का? तुमच्या डोक्यात राजकारणाची घाण आहे ती आधी साफ करा, अशा शब्दात आशिष शेलार यांनी राऊत यांच्यावर टीका केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.