आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिष शेलार यांची गर्जना:शिवसेनेला मुंबईतून तडीपार करुन मुंबईत भाजपाचा महापौर बसवणार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आता आमचे ठरले असून मुंबई महानगर पालिकेत बदल अटळ आहे. शिवसेनेला तडीपार करून पालिकेत भाजपाचा महापौर बसवणार. शिवसेना सामना शेलारांशी आहे, असे म्हणत त्यांना शिवसेनेला खुलं आव्हान दिले आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आशिष शेलार यांना मुंबईच्या भाजपाध्यक्षपदी निवडले आहे. मुंबईच्या अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनावर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

मुंबईत भ्रष्टाचाराची जी बजबजपुरी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केली. त्यांना तडीपार करण्याचे काम आम्ही करणार. पावसाचे दिवस असल्याने आजच सर्व विषयावर मी बोलणार नाही. शिवसेना मुंबईत केलेल्या भ्रष्टाचारापासून पळ काढू शकत नाही. शिवसेना खड्ड्यांपासून हात झटकू शकत नाहीत. निकृष्ट दर्जाचे कोस्टल रोडचे काम, मेट्रो-३ च्या माध्यमातून कारशेडमध्ये केलेला अहंकार, मुंबईकरांच्या डोक्यावर जो भुर्दंड त्या ठिकाणी टाकला आहे, ते पाप शिवसेनेच्या माथ्यावरच आहे.

पिक्चर अजून बाकी

मी मुंबईकरांना विश्वास देऊ इच्छितो की, गेल्या 25 वर्षांत मुंबईबाबत तुम्ही जे चित्र तुम्ही डोक्यात रंगवलंय, मनात जपलंय ते साकारण्याचं काम भाजपा करेल आणि ते मुंबईकरांना सुपूर्त करेल.आम्हाला मुंबईकरांचेही आशीर्वाद यासाठी नक्कीच मिळेल आणि म्हणून आमचे ठरले आहे. तसेच हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अजून बाकी असल्याचेही त्यांनी म्हटले.

ठाकरेंची शिवसेना आता तडीपार
शिंदे गटाचे नवे शिवसेना भवन बनत असल्याचा आनंद वाटत असल्याचं त्यांनी सांगितले. शिवसेना आमच्यासोबत संघर्ष करू शकत नाही. शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना असून ठाकरेंची शिवसेना आता तडीपार होणार आहे, आमचा मुंबई महापालिकेतील निवडणुकीत विजय होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...