आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा महाराष्ट्र दिनी मुंबईत आयोजित करण्यात आली होती. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सवर पार पडलेल्या या सभेत उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले तिघांनीही राज्य सरकारवर सडकून टीका केली. महाविकास आघाडीच्या या सभेवर भाजप नेते आशिष शेलार यांनी 'ही दुर्बळांची भयभीत सभा' असे म्हणत घणाघात केला आहे.
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार, अशोकल चव्हाण, संजय राऊत, छगन भुजबळ या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. महाविकास आघाडीत मतभेद निर्णाण झाल्याच्या चर्चा गेले काही दिवस सुरु होत्या. या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न कालच्या सभेतून करण्यात आला. विरोधी भाजप-शिवसेनेवर यावेळी सर्वच नेत्यांनी सडकून टीका केली.
उद्धव ठाकरेंची टीका
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, अदानीबाबत चौकशी करावी की, नाही. तुमचे काय मत आहे? माझे मत वेगळे आहे. अदानींची चौकशी करूच नका. कारण आपल्या देशाची लोकसंख्या एवढी वाढलीय की, एक माणूस एवढी मेहनत करुन एवढ्या वरती जात असेल तर त्यांचे संपूर्ण आत्मचरीत्र शालेय अभ्यासक्रमात लावा की, श्रीमंत कसे व्हायचेय असा जोरदार टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
शेलारांची खोचक ट्विट
महाविकास आघाडीच्या या सभेला प्रत्युत्तर देताना भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत सभेवरुन जोरदार टीका केली. आशिष शेलार म्हणाले, आमचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भीतीने तीन पक्ष एकत्र आलेत, त्याला हे वज्रमूठ वगैरे म्हणतात.
अजूनही भय संपले नाही
ही दुर्बळांची भयभीत सभा आहे. तिघे एकत्र आले तरी अजूनही भय संपले नाही. गोळाबेरीज सुरूच आहे. दुसरे कारण मुंबई महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराची जंत्री भविष्यात उघड होणार म्हणून अगोदरच झोळी पसरून सहानुभूती गोळा करण्याचा जोरदार कार्यक्रम म्हणजे यांची वज्रमूठ, अशाप्रकारची टीका करत आशिष शेलार यांनी मविआचे वाभाडे काढले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.