आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी आशिष शेलार यांचा आरोप:म्हणाले-मलाही गोळ्या झाडून मारण्याची धमकी, पोलिसांनी समान धागा शोधावा

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. मलाही गोळ्या झाडून मारण्याच्या धमक्या याआधी आलेल्या आहेत. पोलिसांनी यातील समान धागा शोधून काढावा, असा गौप्यस्फोट भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. शिवाजी पार्कवरील मैदानात ते सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना हा हल्ला झाला. त्यांना हिंदुजा रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. या हल्ल्यावरुन आता विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

हल्ला होणे चुकीचीच गोष्ट

आशिष शेलार यांनी या हल्ल्याबाबत म्हटले की, अशाप्रकारचा हल्ला होणे चुकीचीच गोष्ट आहे. याचा आम्ही निषेध करतो. या संपूर्ण प्रकरणाचा पोलिस छडा लावतील. ज्यापद्धतीने मलाही धमक्यांचे फोन आले. गोळ्या झाडून मारण्याचे फोन आले आहेत. यातून समान धागा पोलिसांनी शोधून काढावा.

आम्ही त्यांना घाबरणारे नाही

मनसेप्रमुख राज ठाकरे, अमित ठाकरे, भाजप आमदार नितेश राणे संदीप देशपांडे यांच्या भेटीसाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल झाले आहेत. सदा सरवणकर यांच्याकडूनही त्यांच्या प्रकृतीची भेट देऊन विचारपूस करण्यात आली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संदीप देशपांडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. संदीप देशपांडे म्हणाले, आम्ही कोणाला भीक घालत नाही. यापाठीमागे कोण आहेत, हे मला माहित आहे. आम्ही त्यांना घाबरणारे नाही.

खोपकर यांचे आरोप

संदीप देशपांडे यांच्या हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करावी असा थेट आरोप मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी केला आहे. मुंबई पोलिसांनी दोघांचीही चौकशी करावी व जर त्यात तथ्य निघाले तर त्यांना अटक करावी असा आक्रमक पवित्रा खोपकर यांनी घेतला.

बातम्या आणखी आहेत...