आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविरोधी पक्षाने नरसिंह होऊन खोके सरकारचा अंत करायला हवा, अशी हाक आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या मुखपत्रातून देण्यात आली. त्याला भाजप नेते आशिष शेलारांनी एका पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.
तुमच्याकडे भक्तप्रल्हादही नाही
आशिष शेलार यांनी म्हटले की, 'कर्नाटकने आरे केले तर आम्ही कारे करू' हा महाराष्ट्राने दिलेला इशारा यांनी नेभळट ठरवला... वा रे मर्दा. मुळात विरोधी पक्षाने नरसिंह अवतार धारण करण्यासाठी, या अवताराला बोलावण्यासाठी एका "प्रामाणिक" भक्त प्रल्हादाची गरज असते. तुमच्याकडे नारायण..नारायण जप करणारा भक्त प्रल्हाद आहे का? तुमच्याकडे आता भक्तप्रल्हाद ही नाही, नारायण ही नाही. आणि हो, तुमच्यात आता रामच उरलेला नाही. कधी काळी राम मंदिर आणि राम वर्गणीची खिल्ली उडवली होतीस ना? आता भक्तप्रल्हाद होऊ पाहताय?
हाच का तुमचा मर्दाणी बाणा?
संजय राऊतांना आशिष शेलार म्हणाले की, कर्नाटकला महाराष्ट्र जशास तसे उत्तर देईल.. आरेला कारे करेल.. हा इशारा तुम्हाला नेभळट वाटतो काय? मग राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांना समलैंगिक म्हणते तेव्हा तुम्ही करता तो काय? मर्दानी बाणा असतो काय? वा रे मर्दा वा.
श्रद्धाच्या हत्येवर साधी हळहळही नाही
शेलार म्हणाले, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वशंजाकडे पुरावे मागता, तो काय तुमचा मर्दपणा होता का ? प्रभू राम झालाच नाही... भगवत गीता जिहाद शिकवते असे महान जावई शोध लावणाऱ्या काँग्रेस सोबत इलू इलू जे तुमचे सुरू आहे, ती मर्दानकी आहे का? अहो महाराष्ट्रातील श्रध्दा वालकर नावाच्या लेकीचे 35 तुकडे केले जातात तेव्हा जो पक्ष साधी हळहळ सुध्दा व्यक्त करीत नाही ना, त्याला नेभळटपणा म्हणतात. देशाचे तुकडे करायला निघालेल्या पीएफआयवर आमच्या सरकारनेबंदी घातल्यानंतर त्याचे साधे समर्थन ही न करणे हे नेभळटपणाचे लक्षण नाही का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान काय? हा प्रश्न विचारणे म्हणजे तुम्हाला मर्दानकी वाटते काय
शेलारमामा शिवरायांचे मावळे
शेलार म्हणाले, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जे अभिवादन करायला तयार नाहीत, अशा काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत तडजोडीचा संसार हाच सगळ्यात मोठा नेभळटपणा नाही का? काश्मीर मधून 370 हटवणे, अयोध्येत राम मंदिर बांधणे ही मर्दानी कामे आहेत. होय आम्ही मर्द आहोत, असे होर्डिंग आम्हाला लावावे लागत नाही. भाजपाने करुन दाखवलेय. मनगटात ज्यांच्या जोर असतो तेच मर्दानकी करु शकतात. उरला प्रश्न वंदनीय शेलारमामांचा. अहो तुमचे फुसके कर्तृत्व सिध्द करायला तुम्ही काय करताय? छत्रपती शिवाजी महाराज यांचे निष्ठावंत पराक्रमी मावळे अशी ओळख असलेल्या शेलारमांमाना तुम्ही नेभळट म्हणताय की काय?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.