आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे आरोप:नालेसफाईचा दावा 113% चा केला, आता नगरसेवक निधीवर 73% डल्ला मारला, नागरिकांना काय मिळाले? भाजपचे शिवसेनेवर आरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. अशात मुंबईलाही कोरोनाने विळखा घातला आहे. येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. अस असतानाच पावसानेही येथे धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. मुंबईमध्ये सतत पाऊस कोसळत आहे. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान भाजपने शवसेनेवर गंभीर आरोप केले आहेत.

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी पावसामुळे मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शेलार यांनी ट्विट करत शिवसेनेला सवाल केले आहेत. 'नालेसफाईचा दावा 113% चा केला. आता नगरसेवक निधीवर 73% डल्ला मारला. मुंबईकरांना काय मिळालं? गोरगरिबांच्या घरात पाणी शिरलेच. मुंबईची तुंबई झालीच. रस्त्यांवर खड्डे पडलेच. मग हे टक्के कुठे गेले? मुंबईकर कोविडशी लढत असताना, पालिकेत सत्ताधाऱ्यांच्या टक्केवारीचे घोडे चौखूर उधळत आहेत' असे आरोप करत शेलारांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

'महापौरांच्या मुलालाच कोविड सेंटरमधील मलिद्याचे कंत्राट. शिवसेनेच्या नगरसेवकांना ५३५.९५ कोटींचा निधी. वा! मुंबई महापालिकेत सत्ताधाऱ्यांची “प्रिपेड” समाजसेवा जोरात! इथे मुंबईकर कोविडच्या महामारीत मृत्यूशी झुंज देत आहेत आणि सत्ताधारी कंत्राटदारांसोबत तिजोरी चाटूनपुसून खात आहेत!' असा आरोपही शेलारांनी केला आहे.

मुंबईच्या शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्या मुलालाच कोविड सेंटरमधील कंत्राट दिल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. मनसेने यापूर्वी हा आरोप केला होता. आता भाजप नेते आशिष शेलारांनीही ट्विट करत महापौरांवर आरोप केला आहे.

बातम्या आणखी आहेत...