आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची ठाकरे सरकारवर बोचरी टीका:'महाराष्ट्र नगरी, चौपट राजा...आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट'आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बार, दारुची दुकाने उघण्यात आली मात्र धार्मिक स्थळे न उघडल्यामुळे राज्य सरकारवर प्रचंड टीका केली जात आहे

विरोधीपक्ष भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्याचे पुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर भाजपकडून सातत्याने टीका केली जाते. आता पुन्हा एकदा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पिता-पुत्रांवर जोरदार निशाणा साधला आहे. 'महाराष्ट्र नगरी, चौपट राजा...आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट...' असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अशात मंदिरे उघडण्याची मागणी विरोधीपक्षाकडून सातत्याने केली जात आहे. दरम्यान बार, दारुची दुकाने उघण्यात आली मात्र धार्मिक स्थळे न उघडल्यामुळे राज्य सरकारवर प्रचंड टीका केली जात आहे. यावरुनच आशिष शेलारांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. प्राचीन दंतकथेतील आटपाट नगरीच्या कथेचा आधार घेत शेलार यांनी ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली आहे.

आशिष शेलारांनी ट्विट केले की, 'आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट.. महाराष्ट्र नावाच्या समृद्ध राज्यात कोरोना सोबत पावसाने थैमान घातलेले...शेती, घरे, गुरे, सारे काही उध्वस्त..शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर अनावर... तेव्हा नगराचे राजे "बॉलिवूड" कसे वाचवायचे यावर चिंतातुर झालेले! मदतीसाठी राजा येत नाही म्हणून देवाचा धावा करणारी जनता, आता मंदिरे तरी उघडा असा आर्जव करतेय...त्यावेळी नगरात कुणीही मागणी केली नसताना...पब,बार, रेस्टॉरंट रात्री 11.30 पर्यंत खुले ठेवून"नाईटलाईफची " काळजी "राजपुत्र" करीत आहेत. दुर्दैवी चित्र... "महाराष्ट्र" नगरी आणि चौपट राजा!'

बातम्या आणखी आहेत...