आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:मंत्रिमंडळ बैठकीत संमतीविना प्रस्ताव आल्याने अशोक चव्हाण पुन्हा रुसले

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नाराजीच्या बातम्या पेरल्या जात आहेत : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या विभागाचा संमतीविना आयत्या वेळी प्रस्ताव सादर झाल्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर नाराज झाले आहेत.

गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक प्रस्ताव सादर झाला, त्याची विभागाचे मंत्री या नात्याने चव्हाण यांना कल्पना नव्हती. तो प्रस्ताव मंजूर झाला नाही, पण माझ्या संमतीविना प्रस्ताव सादर कसा झाला असा चव्हाण यांचा आक्षेप असल्याचे सांगण्यात येते. मात्र, हा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विभाजनाचा नव्हता, असे सूत्रांनी सांगितले. रस्ते विभागासाठी स्वतंत्र प्राधिकरण करण्याचा विचार आहे. तसे झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचा बहुतांश निधी नव्या प्राधिकरणाकडे वर्ग होईल. तसेच हे प्राधिकरण सार्वजनिक उपक्रममंत्री या नात्याने शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहे.

चव्हाण यांच्या विभागातल्या बदल्यांचा प्रश्न आहे. त्यांना हवे ते अधिकारी बदलून मिळालेले नाहीत. राजस्थानातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस त्यांचे काही निर्णय करावेत यासाठी दबाव वाढवत आहे,’ असे शिवसेनेतील सूत्रांचे म्हणणे आहे.

प्रस्तावच आलेला नाही
दरम्यान, माझ्या विभागाचा कोणताही प्रस्ताव गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आला नव्हता. सरकारविषयी काही आक्षेप आहेत. मात्र, ते आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासूनचे आहेत,’ असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. तर नाराजीच्या बातम्या पेरल्या जात आहेत असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.