आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडबल - ट्रिपल इंजिन सरकार काय कामाचे? ते कुठेही सैरावैरा पळतेय, महागाई, बेरोजगारी, नोटबंदी यांचे इंजिन कुठल्या दिशेने जाईल नेम नाही. सत्ताधारी ट्रिपल इंजिनला रेड सिग्नल द्यायला हवा. 92 हजार कोटींच्या फिक्स डिपाॅझिटसाठी त्यांना मुंबईत सत्ता हवी असल्याचा आरोप काॅंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला.
ते आज मुंबईत बीकेसी मैदानावर आयोजित मविआच्या वज्रमूठ सभेत बोलत होते.
आम्ही एकत्रच राहणार, लढणार
काॅंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, आज एकत्र आहोत. एकत्र राहणार आहोत. यासाठीच ही सभा आहे. कुणाच्याही मनात वेगळी भावना नको. महाराष्ट्रात बाजार समितीच्या निवडणुकीत मविआला मोठे यश लाभले. हे तिन्ही पक्ष एकत्र आले तर महाराष्ट्राचे भविष्य घडवू शकतो.
बाजार समितीचा कौल 'मविआ'लाच
अशोक चव्हाण म्हणाले, अडचणीच्या काळातही शेतकऱ्यांनी आपला कौल बाजार समिती निवडणुकीत मविआला दिला. आपण हॅट्ट्रीक साधली. अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक चांगली झाली. पुणे आणि त्यानंतर बाजार समितीची निवडणूक आपण जिंकली. आपल्याला षटकार ठोकायचा आहे. महाराष्टातील नगरपालिका, मनपा, विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवायची आहे.
गलिच्छ राजकारण सुरू
अशोक चव्हाण म्हणाले, आयाराम गयाराम लोकांना काहीच सहन होत नाही. राज्यात गलिच्छ राजकारण सुरू आहे. आयाराम गयाराम लोकांना थारा द्यायचा नाही. मविआजवळ काय तर मविआकडे लोकांचे समर्थन आहे, आमच्यासोबत उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोलेही आहेत. येणाऱ्या निवडणुकीत आपल्यालाच यश मिळेल.
ट्रिपल इंजीनची गरज काय?
अशोक चव्हाण म्हणाले, लोक खऱ्यांसोबत आणि प्रामाणिक नेत्यांसोबत आहेत. डबल इंजिन सरकारची चर्चा आहे. मी म्हणतो दोन - तीन इंजिनची गरज काय? ज्यांचे इंजिन कमजोर असतात त्यांना तीन तीन इंजिन लागतात. आपण तिघे एकत्र येऊन विजयी होऊ, त्यांचे इंजित सैरावैरा आहे.
फिक्स डिपाॅझिटवर डोळा
अशोक चव्हाण म्हणाले, महागाई, बेरोजगारी, नोटबंदी यांचे इंजिन कुठल्या दिशेने जाईल नेम नाही. त्यांचे निर्णय, लोक, देश आणि मुंबईच्या हिताचे नाही. मुंबई मनपाचे 92 हजार कोटी रुपयांचे फिक्स डिपाॅझिटवर त्यांचा डोळा आहे त्यासाठी त्यांना मुंबई हवी आहे. शिवसेनेच्या, आणि मविआच्या निर्णयामुळे ही रक्कम जमा झाली. 92 हजार कोटी रुपये त्यांना दिसतात.
इंजिन पालथे होणे बाकी
अशोक चव्हाण म्हणाले, सामान्यजन दिशाहीन झाला. सरकार गेल्यानंतर त्यांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. सत्ताधारी ट्रिपल इंजिनला रेड सिग्नल द्यायला हवा. कर्नाटकात काॅंग्रेसला ताकद मिळत आहे. त्यांचे इंजित फक्त पालथे व्हायचे बाकी आहे. देशाची दिशा बदलारा निकाल कर्नाटकातून येणार आहे.
उद्धव ठाकरेंमागे सर्व जनता
अशोक चव्हाण म्हणाले, उद्धव ठाकरेंनी वर्षा सोडले तेव्हा हजारो लोक त्यांच्यासोबत होते. रस्त्यावर आले. रस्त्यावरुन जाताना त्यांच्यामागे जनाधार होता. त्यांना शक्ति देण्यासाठी काॅंग्रेस - राष्ट्रवादीचे लोक सोबत राहीले. सत्ता गेली पण आम्ही हललो नाही. आम्ही उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी्ंसोबत आहोत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.